कोणाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम सुरू आहे

30

🔹बोगस कामाची चौकशी होणार का ?

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.1नोव्हेंबर):- शासनाच्या वतीने पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असे विविध योजनेचा माध्यमातून जिवती तालुक्यात विकास कामासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करण्यात आले आहे आणि धडाक्याने विकास कामे केली जात आहे. विकास कामाच्या नावाखाली टेकामांडवा ते चिखली रस्त्याचे काम सुरू असुन अंत्यत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे या कामावर स्थानिक परिसरातील निकृष्ट दर्जाच्या मुरुमाचा उत्खनन करून रस्त्याच्या कामात वापरले जात आहे.परिसरातील नाल्यातून माती मिश्रित काळया रेतीचा उपसा करून सिमेंट कॉंकेटच्या काम केला जात आहे या बोगस कामामुळे संबंधित ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांना मालामाल होत आहे ” तेरी भी चूप मेरी भी चूप” अशा प्रकारे रस्त्याच्या कामाची वाट लावली जात आहे.

शासन स्तरावरून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत असून याचा फायदा फक्त संबंधित कंपनी व संबंधित अधिकारी यांची तिजोरी भरण्याचे काम दिसून येत असल्याचे सुशिक्षित नागरिकांन कडून चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक परिसरातील मुरुम उत्खनन करून रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असून या अवैध उत्खनना कडे संबंधित महसूल विभाग डोळे मिटून दुध पिण्याचे काम करण्यात धन्यता मानत आहेत.

लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यात तहसीलदार व त्यांच्या हाताखालचे बाहुले पाटथोपटून घेण्यात शाबासकी समजत आहे असेही चर्चा परिसरात रंगली आहे. लाखो रुपयांची निधी निकृष्ट दर्जाचा विकास कामांचा नावावर चुराडा करणाऱ्या संबंधित कंपनीवर व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी कोण करणार असे प्रश्न विचारले जात आहे? चौकशी होणार की निकृष्ट रस्त्याच्या कामाला आशीर्वाद दिला जाणार, “चोर चोर मावसेरे भाई” अशी चर्चा सध्या जिवती तालुक्यात सुरू आहे