बुलढाणा अर्बन बँक दरोड्यातील आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

29

🔸गेवराईचे सपोनि संदीप काळे यांची कारवाई, आरोपीला पुढील कारवाईसाठी गोंदी पोलिसांच्या ताब्यात

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2नोव्हेंबर):-शहागड येथील बुलडाणा अर्बनवर पडलेल्या दरोड्यातील दोन आरोपीला पकडण्यात गेवराई पोलिसांना यश आल्यानंतर याच प्रकरणातील तिसरा फरार आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. त्याला गेवराई पोलिसांनी गोंदी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शहागड (ता.अंबड) येथील बुलडाणा अर्बन दिवसा दरोडा पडला होता. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले होते. याचा शोध जालना व गेवराई पोलीस घेत होते.

दरम्यान गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे व त्यांचे दोन सहकारी यांनी गेवराई तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथून एका दरोडेखोराला, तर गेवराई शहरातील संजयनगर परिसरातून दुसऱ्यास अटक केली. दोन्ही आरोपींना 30 ऑक्टोबर रोजी सकाळी गोंदी पोलिसाना तसेच जालना पोलिसांना याची माहिती देण्यात आली व आरोपींना ताब्यात देण्यात आले होते, या दरोड्यातील तिसरा आरोपी फरार झाला होता.

याचा शोध सुरू असतांना खबऱ्यामार्फत गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांना फोन आला व कळवण्यात आले की तिसरा आरोपी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होत आहे. यावेळी काळे यांनी आरोपीला गेवराई पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले असता रविवार (ता.31) रोजी रात्री पोलीस ठाणे गोंदी (जि.जालना) येथील फरार आरोपी चरण काळू पवार (वय 22, रा.वनवली, पोस्ट काळे दौलतखान, ता.महागाव जि.यवतमाळ) हा गेवराई ठाण्यात हजर झाला व त्यास पुढील कारवाई साठी पोलीस ठाणे गोंदीच्या ताब्यात देण्यात आले आहे.