अवैध मोहाफुल दारूच्या हातभट्टीवर कारवाई – चिमूर पोलिसांनी जप्त केला 72700 रुपयेचा माल

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.3नोव्हेंबर):- पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत येत असलेल्या माणुसमारी जंगल परिसरात मोहफुल हातभट्टीवर पोलीस विभागाने कारवाई केली असून ही मोहीम बघून अवैध हातभट्टी धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 1 वाजे दरम्यान
पो स्टे चिमूर हद्दीत अवैध मोहाफुल हातभट्टी दारू कारवाई मोहिम राबविण्यात आली.गुप्त खबरेवरून माणुसमारी जंगल परिसरात रेड केली असता सदर ठिकाणी अवैधरित्या मोहा फुल दारूची हातभट्टी मिळून अली. हातभट्टी चालक आरोपी हा पोलिसांना दुरूनच पाहून जंगलाचे दिशेनी पळून गेला. त्याची ओळख पटविली असता त्याचे नाव शुभम शंभरकर रा.कवडशी ता.चिमूर असे असल्याचे समजले.

सदर कारवाईत 6 नग प्लास्टिक ड्रम प्रत्यकी 50 किलो असा एकूण 300 किलो मोहा सडवा (किंमत 60000 रुपये), 3 प्लास्टिक कॅन मध्ये प्रत्यकी 10 लि.प्रमाणे एकूण 30 लि.मोहा दारु( किंमत 9000 रुपये), 3 लोखंडी ड्रम (की.1500 रुपये),
2 जर्मनी वाटे(किंमत1000 रुपये), 6 नग प्लास्टिक ड्रम (किंमत1200 रुपये), असा एकूण 72700/रु.चा माल जप्त करण्यात आला.फरार आरोपी शुभम संभरकर रा कवडशी ता चिमूर याचे विरुद्ध पो स्टे ला अप क्र 473/21 कलम 65(फ,ब,क) म दा का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई ठाणेदार मनोज गभने यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि मंगेश मोहोड, पो हवा विलास निमगडे,पो शि कृनाल राठोड, पो शि शैलेश मडावी यांनी केली.