कोवीड लसीकरणासाठी तहसिलदाराकडून जनजागृती प्राथमिक आरोग्यकेंद्रात लावला कॅम्प

47

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

मुळावा(दि.4नोव्हेंबर):-कोवीड लसीकरणासाठी नागरिकांत जनजागृती करण्यासाठी उमरखेड चे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ज्यांनी लस घेतली नाही असे कर्मचारी व नागरिकांना लस घेता यावी याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथे मंगळवारी लसीकरण कॅम्प घेतला. यात अनेकांनी कोवीड लसचा डोस घेतला.

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाकडून नागरिकात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून लसीकरणासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ होत आहे. परंतु अजूनही काही नागरिक लस घेणे टाळत आहेत .लस घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच जनजागृती व्हावी यासाठी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी पुढाकार घेतला आहे .मुळावा येथे आठवडी बाजारालान येणार्या ज्या नागरिकांना लस घ्यायची आशा करीता मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा कॅम्प घेण्यात आला.

यावेळी बाजार साठी येणाऱ्या नागरिकांना आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी करून ज्यानी लस घेतली नाही अशांना लसीचा डोस देण्यात आला. यावेळी तहसीलदार आनंद देऊळगावकर ,पोलीस स्टेशन पोफळीचे ठाणेदार राजीव हाके, मंडळ अधिकारी यु.यु.जुबंडे, तलाठी पी.पी. सानप ,पोलीस पाटील बरडे, सरपंच ललिता रामराव जामकर, उपसरपंच संजय देशमुख ,इम्रान खान, दिनेश चौतमाल , कयुम शेख, ग्रामसेवक , आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका व सर्व ग्रा.सदस्य त्यांच्यासोबत उपस्थित होते.