वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते 2 कोटी 23 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन !

78

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.5नोव्हेंबर):-वरुड शहरामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन करून उदघाटन करण्यात आले.

वरुड शहरातील प्रभाग क्रं 7 मध्ये नामदेव गडलिंग ते सुरेश दुर्गे ते शरद दुर्गे यांच्या घरापर्यंत काँक्रिट नाली व पेविंग ब्लॉक बसविणे 40 लक्ष 73 हजार 406 रुपये, मातंग पुरा येथे पेविंग ब्लॉक बसविणे व नालीचे बांधकाम करणे 7 लक्ष 37 हजार 496 रुपये, दूंड्याबाबा हनुमान मंदिर ते लोकेश अग्रवाल यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नालीचे बांधकाम करणे 6 लक्ष 95 हजार 803 रुपये निधी, प्रभाग क्र.2 मध्ये बोंडे गुरुजी ते राऊत गुरुजी यांचे घरापर्यंत नाली व रस्ता बांधकाम करणे 6 लक्ष 90 हजार 932 रुपये, बालाजी नगर येथे पार्टी रोड ते सरोदे यांचे घरापर्यंत नाली बांधकाम व रस्त्याचे डांबरीकरण करणे 23 लक्ष 282 रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राचे बांधकाम करणे व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे 43 लक्ष 59 हजार 709 रुपये, प्रभाग क्र.4 मधील बुरड मोहल्ला सार्वजनिक शौचालय समोरील खुल्या जागेत काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसविने 4 लक्ष 98 हजार 493 रुपये, प्रभाग क्र.1 मध्ये भारसाकळे ते अजिंक्य होले यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट नालीचे बांधकाम करण्याकरिता 22 लाख 52 हजार 328 रुपये, सनातन नगर येथिल खुली जागा विकसित करण्याकरिता 38 लाख 87 हजार 217 रुपये, युवराज हरले ते गेंदराज पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याकरिता 4 लाख 52 हजार 130 रुपये, वरुडकर ते श्री. अनिल चौधरी ते श्री. खंडारे ते श्री. नागले यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोडवर नालीचे बांधकाम करण्याकरीता 9 लाख 15 हजार 397 रुपये, बसले ते श्री. उमाळे यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्याकरिता 3 लाख 96 हजार 325 रुपये, त्रिलोक्य बौद्ध विहार येथे प्रवेश द्वार व कंपाऊंड भिंत बांधकाम करणे 52 लाख 9 हजार 414 रुपये, हिरामन घोरपडे ते संजय सातनकर यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्याकरिता 9 लाख 15 हजार 397 रुपये, गजानन धावडे ते चंदन उईके यांचे घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्याकरिता 27 लक्ष 91 हजार 211 रुपये, उपासे ते दुपारे यांच्या घरापर्यंत काँक्रिट रोडचे बांधकाम करण्याकरिता 7 लक्ष 51 हजार 408 रुपये, या विविध विकसकामांकरिता अण्णाभाऊ साठे नागरी सुविधे अंतर्गत, दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत 2 कोटी 23 लक्ष 22 हजार 866 रुपयांच्या निधीची तरतूद करून आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की विकासकामांचे नवीन पर्व सुरू झाले असून येत्या काळात मतदार संघातील सर्वांगीण विकास साधण्यात येणार असल्याचा आपला संकल्प असून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकासाच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी याप्रसंगी केले.

यावेळी नगरसेवक महेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड, प्रभाकर काळे, तुषार देशमुख, बाबा गडलिंग, विलास उघडे, सैयद गौस अली, स्वप्निल आजनकर, संकेत यावलकर, जगबीरसिंग भावे, जितु शहा, राजु शिरस्कर, निखिल बनसोड, बंटी धरमठोक, सुरज वडस्कर, जसमतसिंग भावे, सतीश सातणकर, विनय शहा, सुरज कासुर्दे, अमित साबळे, निसार काजी, जमील पटेल, हेमंत देशमुख, नामदेव गडलिंग, अशोक गडलिंग, फुलर देशमुख, सौ. वनिताताई देशमुख, शिलाताई गडलिंग, सुमनताई गडलिंग, रोशनीताई गडलिंग, राणीताई तरुडकर, रत्नमालाताई तरुडकर, राजकन्याताई अटाळकर, राजेंद्र साकरकर, कृष्णराव डोंगरे, अनिल गवई, शुभम हेडवू, भुषण महात्मे, प्रदीप दवंडे, निलेश टिक्कस, तसेच प्रभागातील इतर नागरिक उपस्थित होते.