म्हसवड येथे 3 रे राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘साहित्य’ संमेलनाचे’ आयोजन

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.5नोव्हेंबर):-ता.माण,जि सातारा येथे शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी मराठी साहित्य मंडळ मुबंई आयोजित 3 रे राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘साहित्य संमेलन’ सकाळी दहा वाजल्यापासून संपन्न होणार असल्याचे मराठी साहित्य मंडळ, म्हसवड शहर अध्यक्ष, महादेव सरतापे यांनी सांगितले.

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष गौतम सरतापे,मुबंई,समेलन अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विनायक जाधव(कराड),मुख्य अतिथी डॉ.जितेंद्र आव्हाड (गृहनिर्माण मंत्री )महाराष्ट्र शासन ,विशेष अतिथी डॉ.विशवजीत कदम (मराठी भाषा मंत्री) महाराष्ट्र शासन,विशेष अतिथी आमदार जयकुमार गोरे,श्रीमती धनश्रीदेवी राजमाने(मा.नगराध्यक्षा म्हसवड नगरपरिषद,म्हसवड),सौ.सविता म्हेत्रे (उपनगराध्यक्षा,म्हसवड नगरपरिषद,म्हसवड), प्रमुख पाहुणे माजी न्यायाधीश,रावसाहेब जोडगे,युवराज सूर्यवंशी,(मा.नगरसेवक),ज्येष्ठ साहित्यिक,डॉ.जयप्रकाश घुमटकर, मुबंई,ज्येष्ठ कवयित्री ललिता गवंदे(ठाणे, राष्ट्रीय उपाध्यक्षा),ज्येष्ठ लेखिका नीलिमा जोशी (राष्ट्रीय सरचिटणीस,कवी कट्टा),ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित,कोल्हापूर उपस्थित राहणार असल्याचे महादेव सरतापे यांनी सांगितले.

साहित्य समेलना दिवशी सकाळी 11 वाजता म्हसवड शहरातून “ग्रँथ दिंडी”निघणार असून या दिंडीमध्ये रथात “संविधान” व महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज याचे ग्रँथ ठेऊन महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून म्हसवड शहरातून निघणार असल्याचे सांगण्यात आले.साहित्य संमेलन हे राज्यस्तरीय असून या संमेलनाला जास्तीत जास्त साहित्य प्रेमी,फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी साहित्य संमेलनाचे म्हसवड शहर अध्यक्ष महादेव सरतापे यांनी केले आहे.