ब्रम्हपुरी एसटी कर्मचाऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्या

🔺पुन्हा किती जीवांची परीक्षा घेणार हे सरकार…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8नोव्हेंबर):-राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आता आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहारतील प्रमुख आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या सत्यजित ठाकूर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या केलेला कर्मचारी सत्यजित ठाकूर हा 34 वर्षांचा होता आणि त्याला चार महिन्यांची मुलगी होती. त्यांची पत्नी नागपूरला राहत होती.

दोनच दिवसांपूर्वी ते ब्रह्मपुरीला आले होते. पातीचा फोन बंद दाखवत असल्याने, त्यानंतर पत्नीने त्यांच्या सहकाऱ्यांना फोन केले. तेव्हा सहकाऱ्यांनी घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. मागील तीन दिवसापासून सत्यजित कुणाला भेटला नसल्याने , आज सकाळी शेजाऱ्यांनी घरचे दार ठोठावले असता सत्यजित ने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला.त्यावेळी सत्यजित हा मृतावस्थेत होता. पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी करीत आहेत.

महाराष्ट्र, विदर्भ
©️ALL RIGHT RESERVED