देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

43

🔹” विश्वरत्न ” विषेशांक सोहळ्यात व्यक्त केले विचार.

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.10नोव्हेंबर):-भारत देशामध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असे चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘विश्वरत्न’ या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी मत व्यक्त केले.

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही पोर्टल चॅनेल तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्याने संपादित केलेल्या ‘विश्वरत्न’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा नुकताच शासकीय विश्रामगृह, चंद्रपुर येथे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांच्या उपस्थितीत पार पडला.

विश्वरत्न विशेषांक प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून समाज समता संघाचे केंद्रीय अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये तर प्रमुख अतिथी म्हणून नम्रता आचार्य ठेमस्कर महिला काँग्रेस सचिव(महाराष्ट्र राज्य), माजी नगराध्यक्ष चंद्रपुर सुनीता लोधीया, समाज समता संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष बबिताताई दौलत चालखुरे, इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे मुख्य संपादक मुन्ना तावाडे, मुख्य कार्यकारी संपादक इंजि. नरेंद्र डोंगरे, कार्यकारी संपादक सुरज दहागावकर उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलय म्हशाखेत्री यांनी केले तर आभार इंजि. नरेंद डोंगरे यांनी मानले.

विशेषांक प्रकाशन सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे मुख्य संपादक मुन्ना तावाडे, मुख्य कार्यकारी संपादक इंजि. नरेंद्र डोंगरे, कार्यकारी संपादक सुरज पि. दहागावकर, विदर्भ ब्युरो चीफ प्रशांत शाहा, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम, चंद्रपुर जिल्हा संपादक अमूल रामटेके, चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी शेखर बोनगीरवार, शुभम जुमडे, प्रितम गग्गुरी, चक्रधर मेश्राम, राकेश कडुकर, रुपाली रामटेके, सुनील बोनगिरवार, शरद कुकुडकर आणि इतर प्रतिनिधी परिश्रम घेतले.