अरुण गंजेवार यांचे निधन

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11नोव्हेंबर):-शहरातील अरुण रामभाऊ गंजेवार यांचे दिनांक 8 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 75 वर्ष होते. ते पंचायत समितीचे सेवानिवृत्त लिपिक होत.

त्यांच्या पश्चात दोन मुली ,दोन मुलं ,सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे .लायन्स क्लब गंगाखेड टाऊन चे अध्यक्ष तथा अतुल इलेक्ट्रॉनिक्स चे मालक अतुल गंजेवार यांचे ते वडील होत.