गणेश शिंदे ला उज्जवल यश संपादन

39

🔹निटमध्ये 576 गुण संपादन करुन तालुक्यात प्रथम

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466)

उमरखेड(दि.13नोव्हेंबर):- तालुक्यातील बेलखेड येथील गणेश शंकर शिंदे या मुलाने वैद्यकीय पुर्व परिक्षेत नीट 2021 मध्ये 720 पैकी 576 गुण घेवून घवघवीत यश प्राप्त करून आपले, कुटुंबाचे व बेलखेड गावचे नाव उज्जवल करून तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान प्राप्त केला.

मुव्हमेन्ट फॉर पीस अॅन्ड जस्टिस फॉर वेलफेअर या संघटनेने त्याच्या या यशाची दखल घेत गणेश चे कौतुक करून त्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी शाबासकीची थाप देत गणेश चा शॉल ,पुष्पगुच्छ, पेढा देवून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी एमपीजे चे जिल्हाध्यक्ष फिरोज अन्सारी, तालुकाध्यक्ष गजानन भालेराव, उमरखेडचे शहाराध्यक्ष मोहसीन राज सह बेलखेड एमपीजे युनिटचे अंकुश वाळुककर, सुभाष शिंगनकर, दत्ता शिंगनकर, संतोष ठाकरे, पवन धुमाळे सुरेश ठाकरे, रमेश सावळ्कर, सह गजानन शिंदे, भास्कर रेघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.गणेश ने डॉक्टर झाल्यावर गरीबांची सेवा करावी अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्या कडून करण्यात आल्या.

गणेश शंकर शिंदेचे प्राथमिक शिक्षण वर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलखेड.वर्ग 5 ते 10 वी जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा उमरखेड तर वर्ग 11ते 12 मनोहरराव नाईक जुनीयर काॅलेज गुंज ता महागाव येथे झाले.आपल्या यशाचे श्रेय गणेश ने आई-वडील, आजोबा विठ्ठल डोळस सह प्रविण सुर्यवंशी सर, प्रा सुनील काळे, डॉ .एच धर्मकारे यांना दिले.