बोडके ता.माण येथे उस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.16नोव्हेंबर):-बोडके,ता.माण,जि. सातारा येथे उस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करणेत आली यावेळी बोलताना माजी सभापती व वंचितचे सल्लागार बाळासाहेब रणपिसे म्हणाले “जगेन तर देशासाठी व मरेन तर देशासाठी “अशी प्रतिज्ञा करणारे लहुजी साळवे हेच खरे आद्य क्रांतिकारक होते .आपल्या तालमीतून स्वातंत्र्यासाठी लढणारे शेकडो क्रांतिकारक त्यांनी तयार केले एवढेच नाही तर महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी सुरू केलेल्या शिक्षण चळवळीस पाठिंबा दिला धर्मांध व जातीय वाद्यांकडून सावित्रीबाई याना त्रास होऊ नये म्हणून संरक्षण दिले म्हणून बहुजन व अस्पृश्य समाजातील मुला, मुलींना शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

त्याचबरोबर दीड दिवसांची शाळा शिकलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी 31 कादंबऱ्या,प्रवासवर्णन,कथासंग्रह,लिहले,शिवरायांचा पोवाडा रशियामध्ये गायला व देशाबाहेर शिवरायांची कीर्ती पोहचवली पण त्यांना शासनांने ज्ञानपीठ पुरस्कार दिला नाही.उस्ताद लहुजी,साळवे,बंडखोर फकिरा, अण्णा भाऊ यांची इतिहासाने व शासनाने सुद्धा योग्य दखल घेतली नाही कारण ही मागास जातीत जन्माला आली होती.

यावेळी बोलताना वंचित आघाडीचे जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ म्हणाले की बहुजन व वंचित समूहाला राजकीय सत्ता काबीज करायची असेल तर संघटित राहून वंचित आघाडीस ताकत दिली पाहिजे ,प्रस्थापित राजकीय पुढारी यांनी फक्त तुमचा वापर केला आहे त्यांच्या मागे फिरणे बंद करून स्वाभिमान टिकवा व वंचित आघाडी सोबत राहून सत्ता मिळवा हेच क्रांतिकारक लहुजी साळवे याना अभिवादन ठरेल.

वंचित आघाडीचे अध्यक्ष युवराज भोसले म्हणाले की नुसत्या जयंत्या साजऱ्या करून चालणार नाही त्यांच्या विचाराचे अनुकरण केले पाहिजे उस्ताद लहुजी साळवे यांच्याप्रमाणे सर्व जातीतील लोकांना सोबत घेऊन आपली राजकीय ताकत वाढविली पाहिजे
कार्यक्रमास सरपंच जाधव ,ग्रामपंचायत सदस्य पवार ,युवक आघाडीचे निखिल कुंभार,दहिवडी शहर अध्यक्ष राजू आवटे,अमोल खरात उपस्थित होते.लहुजी सेनेचे अध्यक्ष अनिल माने ,सुनील माने व त्यांचे सहकारी यांनी पाहुण्यांचे स्वागत ,सूत्रसंचालन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED