मुलभूत अधिकार व राष्ट्र ग्रंथाची जपणूक करावी लागेल नाही तर… पुन्हा गुलामी- एस के भंडारे

30

✒️ठाणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

ठाणे(दि.16नोव्हेंबर):– भारतीय संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान कर्त्यानी देशातील चातूर्वणाची विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय संविधाना द्वारे दिलेले कलम 14 ते 35 मुलभूत अधिकार व भारतीय संविधान ह्या राष्ट्रग्रंथ ची जपणूक करावी लागेल नाहीतर पुन्हा आपल्याला चातूर्वणाप्रमाणे गुलामीत रहावे लागेल नव्हे पेशवाई प्रमाणे अस्पृश्यांचा विटाळ होऊ नये म्हणून गळ्यात मडके आणि कमरेला खराटा लावावा लागेल असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव व समता सैनिक दला चे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा ठाणे यांच्या वतीने आनंदवाडी, कल्याण येथे आयोजित केलेल्या समता सैनिक दलाच्या भव्य मेळाव्यात प्रतिपादन केले.

ते पुढे असे म्हणाले की, आज देशात कामगारांचे कामगार हिताचे 44 कायदे नष्ट करून 5 नवीन कायदे करून 8 तासा ऐवजी 12 तासाचे काम करणे,ट्रेड युनियन न करणे, संप न करणे असे कामगार हिता विरुध्द बदल केले आहेत, खाजगीकरण- कंत्राटीकरण , मागासवर्गीय समाजावर जातीय अन्याय अत्याचार, शिष्यवृत्ती नाही, आता शिक्षणात आरक्षण नाही, नोकरीत पदोन्नती नाही इत्यादीमुळे समाजात असहिष्णु तेचे वातावरण निर्माण झाले आहे. 14 नोव्हेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता सुभेदार रामजी बाबा यां ची जयंती असल्याने एस के भंडारे , मेजर जनरल डी एम आचार्य, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मेजर व्ही डी हिवराळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष व जी ओ सी विजय गायकवाड यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात येऊन सर्व सैनिक, अधिकारी यांनी मानवंदना दिली.

मेळाव्याच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष लेफ्ट. कर्नल भास्कर आरकडे व दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष व समता सैनिक दला चे जीओसी विजय गायकवाड होते. या प्रसंगी डी एम आचार्य, व्ही. डी. हिवराळे यांनी मार्गर्शन केले. मेळाव्याचे सूत्र संचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस व दलाचे डेप्युटी जीओसी प्रभाकर सूर्यवंशी व दलाचे सचिव जाधव यांनी केले. या प्रसंगी समता सैनिक दलाची परेड, संचलन , परिक्षा घेण्यात येवून 28 जणांना प्रमोशन देण्यात आले. जिल्हा शाखेच्या वतीने पर्यटन काढून समता सैनिक दलाचे बँड पथक निर्माण करण्यात येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांनी जाहीर केले. या मेळाव्यास कल्याण, ठाणे,उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी या तालुक्यातील सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.