चांदवड तालुक्यात पाटे येथे शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.18नोव्हेंबर): – चांदवड तालुक्यातील पाटे येथे दुपारी दोन सख्ख्या भावांचा घरच्याच शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलीस पाटील मच्छिंद्र कासव यांनी चांदवड पोलीस स्थानकाला दिली उप जिल्हा रुग्णालयात शोधन झाल्यानंतर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आई-वडिलांना ही दोनच मुले असल्याने आई वडील पूर्णता पोरके झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

पार्टी येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांचा मोठा मुलगा संजय तळेकर वय 13 इयत्ता सातवी तर साहिल संजय तळेकर व 11 इयत्ता पाचवी हे दोघे सख्खे भाऊ शेताचे शेजारील नाल्या लगत बकऱ्या चारलण्यासाठी गेलेले असताना हे दोघे त्यांच्या शेतातील शेततळ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाली ची घटना घडली पोलीस स्थानकामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली