निसर्गाच्या सानिध्यात महाविद्यालय,मन प्रसन्न झाले – प्रमोद हेरोडे

31

✒️आष्टी प्रतिनिधी (सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.19नोव्हेंबर):- तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे नविन विधी (लॉ) महाविद्यालयाच्या अंतिम मान्यतेसाठी सादर करावयाच्या समितीचे अध्यक्ष डॉ.प्रमोद हेरोडे यांनी वरील मत महाविद्यालयांचा परीसर बघितल्यावर व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की,आष्टी सारख्या अतिशय ग्रामीण भागात,प्रज्यन्य छायेखालील प्रदेशात एवढी हिरवळ असणारे व झाडे असणारे महाविद्यालय पाहायला मिळणे दुर्मिळ पण आपण सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मिळून हे सुंदर नंदनवन फुलवले आहे.माझे मन हा परीसर,तुमचे पाणिव्यवस्थापन,स्वच्छता पाहून भारावून गेले आहे.

त्यांनी यावेळी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर हंबर्डे यांनी प्रथम समिती सदस्य डॉ.प्रमोद हेरोडे,डॉ.आनंद देशमुख,डॉ.दिनेश कोलते स्वागत केले व संस्थेतर्फे त्याना परीसर दाखवला.‌यावेळी संस्थेचे सचिव अतूलकूमार मेहेर,सदस्य महेश चौरे,तय्यब शेख,हंबर्डे महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे हे उपस्थित होते.‌