नगर परिषद उमरखेड वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार – डी.के. दामोधर (जिल्हा महासचिव)

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

उमरखेड(दि.19नोव्हेंबर):-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चांदूर रेल्वे येथे आयोजित करण्यात आलेल्या संत्रा परिषदेच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड व जिल्हा महासचिव डी के दामोधर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत प्रदेशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर, मा.गोविंदजी दळवि प्रदेश उपाध्यक्ष , मा.निलेश विश्वकर्मा युवा प्रदेशाध्यक्ष, मा. शेषराव ढोके नगराध्यक्ष कारंजा लाड, यांची भेट घेऊन निवडणुकी संदर्भात चर्चा केली . प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांनी निवडणूक लढविणे आणि जिंकण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या व जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूका स्वतंत्र व ताकतीने लढविणार असल्याचे निर्देश दिले.

यावेळी धनंजय गायकवाड जिल्हाध्यक्ष ,डी के दामोधर जिल्हा महासचिव, संतोष जोगदंडे तालुकाध्यक्ष उमरखेड, बुद्धरत्न भालेराव तालुकाध्यक्ष पुसद ,उकेश्वर मेश्राम ,अशोक शेंडे ,पद्मा दिवेकर ,ज्ञानदीप कांबळे ,प्रसाद खंदारे ,दादासाहेब जोगदंडे, मार्शल विनोद बर्डे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डी के दामोधर यांनी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर व स्वतंत्र लढवून सत्तेपासून वंचित असलेल्या संपूर्ण समाजाला प्रतिनिधित्व देणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED