रस्त्याच्या आराखड्यात बदल करावा, अन्यथा रस्ता रोको चा इशारा; एम एस आर डी सी नासिक अभियंत्यांना निवेदनाद्वारे मागणी.

27

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20नोव्हेंबर):- चांदवड -सब स्टेशन चांदवड ते पेट्रोल पंप चौफुली चांदवड या रस्त्याच्या आराखड्यात बदल करणेबाबत व नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोय बाबत एम एस आर डी सी नाशिक येथील अभियंता यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले
चांदवड ते मनमाड या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असून ठेकेदारामार्फत मनमाड चांदवड चौफुली पासून रस्त्याच्या लगेच देण्याचे( गटारीचे) काम सुरू आहे सदर गटारीची उंची जमिनीपासून 4 फूट उंच दिसत असून सदर गटारी मुळे चांदवड बाजारपेठेचा पारंपारिक येणे जाण्याचा रस्ता बंद झालेला असून ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच बाजार पेठे पासुन पेट्रोल पंपा पर्यंत ड्रेनेज ची उंची समान असून कृषी उत्पन्न बाजार समिती लगतचे गाळे व रेणुका कॉम्प्लेक्स चे गाळे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते तसेच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यातील दुभाजकावर स्ट्रीट लाईट सब स्टेशन चांदवड ते पेट्रोल पंप चौफुलीवर बसविण्यात यावे सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन एम एस आर डी सी मार्फत सदरील नकाशात बदल करण्यात यावा व नागरिकांची गैरसोय टाळावी अन्यथा सर्वपक्षीय व चांदवड वासियं तर्फे चांदवड मनमाड रस्ता बंद करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यास सर्वस्वी जबाबदार एम एस आर डी सी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर शांताराम घुले सामाजिक कार्यकर्ते, गणेश निंबाळकर प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष ,चांदवड तालुका शिवसेना शहर प्रमुख संदीप उगले, पांडुरंग भडांगे सामाजिक कार्यकर्ते, उमेश जाधव आदींच्या स्वाक्षरी आहेत.