लासलगाव येथे जय जनार्दन अनाथाश्रम व वृद्धाश्रम येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न

32

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20नोव्हेंबर):-लासलगाव जय जनार्दन अनाथ व वृध्द आश्रम पिंपळगाव नजीक लासलगाव या ठिकाणी जनार्दन स्वामी अनाथ आश्रम चे संस्थापक परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी जी महाराज व आश्रम सचिव दिलीप बाबुराव गुंजाळ सर यांच्या मातोश्री यांचे प्रथम पुण्यस्मरण यानिमित्ताने गेल्या सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता.

यामध्ये पहिले किर्तन सेवा ह भ प श्री लखन गिरीजी महाराज निळखेडा आश्रम, दुसऱ्या दिवशी चे किर्तन सेवा ह भ प अश्विनीताई कदम औरंगाबाद, तिसऱ्या दिवशी चे किर्तन सेवा ह भ प मोनाली ताई गोरडे सिन्नर, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प आश्रमिय व्यावस्थापिका संचालक श्री संगीता ताई गुंजाळ, पाचव्या या दिवसाची सेवा हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज शिंदे ,सहाव्या दिवसाचे कीर्तन ह भ प अश्विनीताई म्हाञे वडगाव लांडगा, सातव्या दिवसाची कीर्तन सेवा स्वामी मुक्तानंद गिरीजी महाराज, आठव्या दिवशीची किर्तन सेवा ह भ प बालकिर्तनकार ज्ञानेश्वर महाराज फापाळे , यांच्या हस्ते काल्याचे किर्तन होऊन समाप्ती करण्यात आली यावेळेस पंचक्रोशीतील महत व साधुसंत मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ठिकाणी आलेले संत व मंहत यानी अनेक उपदेशपर प्रबोधनकारांचे प्रवचने सुद्धा केले तसेच या ठिकाणी जमलेल्या भाविक भक्तांना ज्ञानाबद्दल अतिशय उत्कृष्ट प्रमाणे माहिती दिली व त्यानंतर काल्याचे किर्तन होऊन कार्यक्रमा ची समाप्ती करण्यात आली व या ठिकाणी जमलेले सर्व भाविक भक्तांना प्रसादाचा लाभ घेतला तसेच आईच्या पुण्यस्मरनार्थ महाराष्ट्राचे पिठाधेश्वर महामडलेश्वर आध्यात्मिक शिरोमणी श्री श्री 1008 शिवगिरीजी महाराज याच्या अमृत वाणीतुन सर्व भाविक भक्तानी आईचा महिमा काय असतो याचे वर्णन केले आईना तसे 5 मुले व 4 मुली नातु पणतु व अनाथ व वृध्दाचा गोतवळा आहे आश्रमिय संचालक संचिव श्री दिलीप बाबुराव गुंजाळ सर हे घरात सर्वात लहान असल्याने आई लासलगाव येथे राहत असे श्री गुजाळ सर यानी सर्वाचे आभार मानले