महिंद्रा कंपनीची भेंडी शेतकऱ्यांना फायद्याची – भगवान पाटील…

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगाव(दि.21नोव्हेंबर):- येथील साकरे गावातील शेतकऱ्यांना महिंद्रा कंपनीच्या संकरित भेंडीच्या वाणाबद्दल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भगवान पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिंद्रा कंपनीच्या वतीने साकरे गावात प्रात्यक्षिक पिक पाहणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम साकरे येथील भेंडीचे व्यापारी भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतातील भेंडीची गुणवत्ता प्रत्यक्ष पहायला मिळाली.

ज्ञानेश्वर पाटील यांनी महिंद्रा कंपनीच्या भेंडी पिकाविषयी त्यांचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितलं. तद्नंतर महिंद्रा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भगवान पाटील यांनी संकरित भेंडी कीर्ती पिकाबद्दल माहिती देतांना फवारणी तसेच खतांचे व्यवस्थापन याबद्दल सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे ही भेंडी तोडण्यास सोपी व वजनाला चांगली अशा स्वरूपाची असल्याबद्दल माहिती दिली. यावेळी साकरे, निशाणे, साळवा, पिंपळे या गावातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. सदर महिंद्रा किसान प्रशिक्षण कार्यक्रम ज्ञानेश्वर पाटील यांच्या भेंडीच्या शेतात घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन महिंद्रा कंपनीचे जळगाव प्रतिनिधी दिनेश महाजन यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED