मुस्लिम समाजाच्या संवैधानिक हक्क व अधिकारांसाठी राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदवा. डॉ.गणेश खेमाडे

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.१९नोव्हेंबर):-वंचित बहुजन आघाडी सदैव मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवत असते.५ जुलै रोजी विधान भवनावर भव्य मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५ टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी,धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाडी ने शासनाला सुपूर्द केले आहे.ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.,वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा., सारथी -बार्टी – महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांसाठी दि.२२ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनांचा एल्गार वंचित ने पुकारला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचने नुसार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३०वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन मराठवाडा आध्यक्ष आशोक हिंगे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. तरी या आंदोलनात बहुसंखेने सहभाग नोंदवावा असे अवाहन बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडी प्रसिद्धी प्रमुख डॉ.गणेश खेमाडे यांच्यासह ज्ञानेश्वर कवठेकर, संतोष जोगदंड,भारत तांगडे, पुरुषोत्तम वीर,बबनवडमारे, शेख युनूस,पुष्पाताई तुरूकमारे,सुदेश पोतदार, दगडू दादा गायकवाड,आनंत सरवदे,अंकुश जाधव,धम्मानंद,साळवे,बालाजी जगतकर,मेजर अनुरथ वीर, औसरमल,तासतोडे,यांनी केले आहे.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED