काकड आरतीची खरूसमध्ये समाप्ती

54

🔹सहाशे ते सातशे भक्तांनी प्रसादाचा स्वाद घेतला

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.21नोव्हेंबर):-महापुरुष कृपेने व माता पैनगंगेच्या आशीर्वादाने पैनगंगेच्या तीरावर असलेले खरूस गाव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खरुस ता.उमरखेड मध्ये काकडा आरतीचा महोत्सवाला दि. 21/ 10/2021 रोजी गुरुवार सुरुवात अगदी जल्लोषात लहान थोर मंडळीच्या उपस्थित अगदी आनंदमय वातावरणात झाली. यामध्ये महापुरुष भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.

अगदी सकाळी साखर झोप बाजूला ठेवून नामस्मरण करत करत पाच वाजता स्नानसंध्या करून आयोजक ह.भ. प.मारुती महाराज पुरी यांच्याघरी महापुरुष मंदिरात भजनाचे आयोजन करण्यात आले होते.

यांच्या घरी सकाळी पाच वाजता भजनाला सुरुवात होत गेली.
ते ठीक सात वाजेपर्यंत गावातील भक्तांची व भजनाची आवड असणारे स्त्री-पुरुष मंडळीची आवर्जून उपस्थिती राहत होती.
या भजनी मंडळाचे अध्यक्ष गंगाराम पाटील वानखेडे उपाध्यक्ष दत्तराव वानखेडे पेटीवादक रंगराव वानखेडे तबलावादक रमेश वानखेडे व गायनाचार्य पांडुरंग पाटील, निरंजन पाटील, प्रकाशराव वानखेडे व्यापारी, आनंदराव पाटील, विष्णू पाटील, कैलासराव पाटील, शंकराव पाटील, बाबुराव पाटील, भागवत महाराज यांनी नित्य नियम सहकार्य केले.या काकड आरतीची समाप्ती अतिशय उत्साहात आनंदात दि. 20/ 11 /2021 रोज शनिवारला पार पडली.

यामध्ये सर्व गावकरी मंडळींनी जमेल तसे सहकार्य केले.
आणि सर्वांनी स्वरुची भोजनाचा आनंद सकाळी 12 ते 4 पर्यंत भोजनाचा आनंद घेतला.यामध्ये प्रसाद म्हणून शिरापुरी,वरण भात,आलु भाजी यावर सर्व भक्तांनी अतिशय भक्तिभावात या प्रसादा वर ताव मारला.गावातील स्त्री-पुरुष अंदाजे सातशे लोकांनी या महाप्रसादाचा आनंद घेतला.सर्व भक्त मंडळी च्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता व सर्वांनी समाधान व्यक्त केले.हे विशेष ह. भ. प. मारुती महाराज त्यांची धर्मपत्नी सौ. संगीताताई मारोती पुरी सरपंच असून हा सर्व कारभार आनंदाने सांभाळतात हे विशेष.