क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या येणाऱ्या स्मृतिदिनानिमित्त अर्हेर – नवरगाव येथील फुलेप्रेमींचा अनोखा उपक्रम

28

🔹ज्ञानज्योती सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेऊन अभ्यासाच्या क्रांतीकडे वाटचाल

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.22नोव्हेंबर):- भारत देश हा परंपरा, संस्कृती ला घेऊन चालणारा देश आहे. त्यातही भारतातील महाराष्ट्र राज्य हा संत – महात्म्यांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमी मध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या क्रांतिसूर्याचा जन्म झाला होता. यांच्या कार्याला सूर्याच्या तेजाची उपमा दिलेली आहे कारण यांनी मुलींना शिक्षण दिलं, गोरगरिबांना, दीन दुबळ्याना शिकवल, आणि भारत देशात शिक्षणाची क्रांती घडवून आणली. याच महात्म्याची दिनांक 28 नोव्हेंबर ला स्मृतिदिन आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाच औचित्य साधून रॉयल्स युवा मंच अर्हेरनवरगांव व इनस्पायर करिअर ॲकाडमी ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यामानाने दि. 21 नोव्हेंबर रोजी ज्ञानज्योती सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली यात 351 परीक्षार्थी व 49 परीक्षकांनी सहभाग घेऊन पार पाडली.या वेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्या बद्दल परीक्षकांचे व परीक्षार्थी यांचे रॉयल्स युवा मंच अर्हेरनवरगांव व इनस्पायर करिअर ॲकाडमी ब्रम्हपुरी यांनी मनःपुर्वक आभार व धन्यवाद मानले.