ज्ञानाच्या प्रतिकाचे संविधान

43

संविधानाने प्रत्येक नागरिकांना मग तो कोणत्याही जातीधर्माचा, वंशाचा, पंथाचा असो सर्वांना माणूस म्हणून अभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला.या अधिकारा सोबतच आपल्या कर्तव्याची ही जाणीव होणे गरजेचे आहे. कमीत कमी शब्दात संपूर्ण नैतिकतेचा सार असलेली जगातील सर्वश्रेष्ठ उद्देशिका ही उद्देशिका म्हणजे सरनामा हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे. ह्या आत्म्यामध्ये मानव जातीची संपूर्ण आदर्श जीवन पद्धती साचेबंद केलेली आहे.म्हणून तर डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. भारतात नांदणारी विविधता,विविध भाषा,विविध धर्म,पंथ,वंश,जाती यांच्यातील वेगवेगळ्या श्रद्धा,उपासना, चालीरीती,पद्धती,परंपरा या सगळ्यांचा आदर आणि संवर्धन करीत. देशाला विज्ञानाधारित आधुनिक प्रगतशील राष्ट्र बनविण्याचा यशस्वी व शांतताप्रिय मार्ग म्हणजेच संविधान.

अशा सर्व गुण संपन्न सर्वश्रेष्ठ संविधानाच्या निर्मितीचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे सोपविण्यात आले होते. ते मसुदा समितीने संविधानाचा मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये तयार केला या समितीमध्ये सात सदस्य होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते.भारताच्या पवित्र संविधानाचे ऐतिहासिक कार्यात सर्वच सदस्यांचा सहभाग आवश्यक होता पण तसे न घडता. बाकी सदस्यांनी विविध बहाने करून सविधान निर्मितीच्या कार्यापासून वेगळे झाल्यामुळे संविधान निर्मितीचा भार पूर्णपणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर पडला.पण हा निश्चयाचा महामेरू जराही विचलित नव्हता, या ज्ञानाच्या महासागराने आपल्या अव्याहत व्यासंग विद्वत्ता व कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतीय संविधान निर्मिती महान कार्य दिवस-रात्र अखंड 21 तास लिखाण करून 9 डिसेंबर 1946 पासून सुरू केलेले.कार्य 26 नोव्हेंबर 1949 ला म्हणजे, दोन वर्षे अकरा महिने 17 दिवसात पूर्ण केले, श्रेय मात्र त्यांनी समितीच्या सर्व सदस्यांना दिली.आपल्या देशाचे संविधान लिहिण्या अगोदर त्यांनी चीन,जपान,अमेरिका,ऑस्ट्रेलिया,कॅनडा,दक्षिण, आफ्रिका,लंडन,इंग्लंड, अशा अनेक देशाच्या राज्यघटनेचा सखोल अभ्यास केला होता.

ऑस्ट्रेलियाची घटना 128 कलमांची असून तिला आठ वर्षे नऊ महिने लागले. कॅनडाची घटना 147 कलमांची असून तिला दोन वर्षे पाच महिने लागलेत, दक्षिण आफ्रिकेची घटना 153 कलमांची असून तिला एक वर्ष लागले, तसेच अमेरिकी घटना ही सर्वात लहान फक्त सात कलमांची असून ती पूर्ण करण्यास थॉमस जेफरसनला चार महिने लागले. मग आपल्या देशाची घटना जगात सर्वात मोठी 395 कलमांची आठ ते नऊ वर्ष सहज लागावयास होती. पण तसे झाले नाही जगात सर्वात मोठी व सर्वात श्रेष्ठ घटना लिहिणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांनी भारतीय संविधानाच्या रुपाने भारतातील सर्व जाती-धर्माच्या स्त्री पुरुषांवर जन्मोजन्मी चे उपकार केलेले आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. लंडन येथील “स्कूल ऑफ एकोनोमिक्स” व “ग्रेज इं स्कूल ऑफ लंडन” या विद्यापीठातील आठ वर्षाचा अभ्यासक्रम या ज्ञानाच्या महासागराने भारतीय संविधाना प्रमाणे सतत 21 तास अध्ययन करून, दोन वर्षे तीन महिन्यातचं पूर्ण केला.याची दखल अमेरिका व लंडन सारख्या प्रगतशील देशाने घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या देशात उभारला जपान सारखे राष्ट्र डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांचे जीवन चरित्र आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून डॉक्टर.बाबासाहेबांना वंदन करतं. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने गेल्या तीनशे वर्षात सर्वात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले.असता जगातील नंबर एक चा विद्यार्थी म्हणून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करून, त्यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच उभारून त्या पुतळ्याखाली सोनेरी अक्षरात “सिम्बॉल ऑफ नॉलेज” असे ठळक अक्षरात लिहिलेले आहे. जगातील प्रसिद्ध इंग्लंडच्या “ऑक्स फर्ड” विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य असे तैल चित्र लावण्यात येते. आणि हेच ते जगातील सर्वात उंचीचे ज्ञानाचे प्रतीक असा संदेश संपूर्ण जगाला देत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे थोर विचारवंत विद्याव्यासंगी समाजसुधारक, अर्थशास्त्र,समाजशास्त्र,धर्मशास्त्र,इतिहासकार,घटनाकार होते. त्यांना हिंदी,इंग्रजी,मराठी, तमिळ,गुजराती,तेलगू,संस्कृत,पाली अशा नऊ भाषांचे सखोल ज्ञान होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रीक,रोम आणि अमेरिकेतील गुलामगिरीच्या इतिहासाचा ही सखोल अभ्यास केला होता.त्यांचे उच्च शिक्षण अमेरिका,इंग्लंड,लंडन येथे होऊन त्यांनी MA. PHD. MSC. DSC. LLD. बॅरिस्टर,ऑट लॉ, डि.लिट, आशा अनेक पदव्यांनी उच्च विद्याविभूषित होऊन ते भारतात परत आले. प्रॉव्हीन्शीयल,डिसेंट्रलायझेशन,ऑफ इम्पीरियल,फायनान्स, आणि “दि प्रॉब्लम ऑफ दि रुपी” या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्ही प्रबंधाचे ग्रंथरूपात प्रसिद्ध करून अर्थशास्त्र व राज्यशास्त्राचे अतिशय मोलाचे संशोधन दिल्याबद्दल इंग्लंड सारखे राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा म्हणतात की डॉ.बाबासाहेब आंबेडकर माझ्या देशात जन्माला आले असते,तर मी त्यांना सूर्य म्हटले असते,पण आमचे दुर्दैव की ते आमच्या देशात जन्माला आले नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ प्रसिद्ध केलेली असून त्यांचेकडे साठ हजार पुस्तकांचे भव्य ग्रंथालय होते.विशेष बाब म्हणजे हे संपूर्ण पुस्तके त्यांनी वाचून काढली होती.मग एवढा ज्ञानाचा महासागर भारतातच काय पूर्ण जगात कोणी झाला नाही, आणि होणारही नाही.
भारताच्या आधुनिक इतिहासात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उदय ही एकोणिसाव्या शतकातील अवलोकिक की घटना होती.कारण त्यांच्या उदयाने इतिहासाचे चक्र उलट्या दिशेने फिरायला लागली.आणि एका वैभवशाली,दैदिप्यमान,सांस्कृतिक, कालखंडापर्यंत जाऊन स्थिरावले परत एका इतिहासाची पुनरावृत्ती होऊन एक नवी पहाट उगवली, आणि एका ऐतिहासिक क्रांतीचा जन्म झाला.अन्याय अत्याचार व गुलामीचे जोखड झुगारून समता,स्वातंत्र्य,बंधुता व न्यायाची प्रस्थापना भारतीय संविधानाच्या रुपाने झाली.

भारतीय संविधान म्हणजे देशाचा मूलभूत कायदा इतर सर्व कायदे संविधान अपेक्षा दुय्यम दर्जाचे असतात.संविधानाच्या चौकटीतच राहून शासनाला कार्य करावे लागते.आपले संविधान शासन आणि नागरिक यांच्यातील संबंधाचे व नागरिकांच्या आपापसातील संबंधाचे स्वरूप निश्चित करते. शासनाचे कार्य रचना व सत्ता आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्य व अधिकार निश्चित करते.संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिशाला सविधान अर्पण करतांना म्हणतात, की मी लिहिलेली राज्यघटना ही जगातून सर्वश्रेष्ठ आहे.तिला जगात तोड नाही.पण ह्या राज्यघटनेला राबवणारे लोक चांगले नसतील, तर ती कुचकामी ठरेल लोकशाहीबद्दल ते म्हणतात, की लोकशाहीचे खरे व्याकरण अवगत झाल्याशिवाय तुम्हाला समता स्वातंत्र्य आणि न्यायाची भाषा बोलता येणार नाही. तसेच या देशात पार्लमेंटरी लोकशाही ची पद्धत यशस्वी व्हायची असेल, तर सरकार व जनता उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे आवश्यक आहे.जिथे लोकशाही नांदते तेथे प्रत्येक व्यक्तीच्या विकासाला पूर्ण संधी मिळाली पाहिजे समाजात स्तरीकरण होत.गेले की व्यक्ती विकास खुटतो जिथे जाणून-बुजून व्यक्तिविकास खुंटण्याची प्रक्रिया चालू असते.तेथे लोकशाहीला नकार मिळतो.
जाती,धर्म,लिंग,भाषा,व परंपरा यापलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून,जीवन जगण्याचा व आपला विकास करण्याचा हक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच संविधानाच्या माध्यमातून सर्वच भारतीयांना दिला.जगातील संपूर्ण मानव जातीला जीवनात आत्म परहित साधणारे परमोत्कृष्ट गुण भगवान बुद्धाने 10 परिमिताच्या रूपाने दिले.

तर त्याच मानवजातीला नियंत्रित करून त्यांच्या न्याय हक्क व स्वातंत्र्याचे संरक्षण करणारे परमोद कृष्ट 10 परिमिता डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रुपाने दिलीत. संविधानाची प्रास्ताविका म्हणजे तत्वज्ञानाच्या 10 परिमिता होय .
1) आम्ही भारताचे लोक 2) सार्वभौम 3) समाजवादी 4) धर्मं निरपेक्ष 5) लोकशाही 6) गणराज्य 7) न्याय 8) स्वातंत्र्य 9) समता 10) बंधुता ह्या परिमिता प्रास्ताविकेचे तत्वज्ञान प्रदर्शित करतात. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी सर्वजण उद्दिष्टे यामध्ये समाविष्ट आहेत.तसेच सरकारने केलेल्या कामकाजाचे परीक्षण व मूल्यमापन करण्याची ही एक मोजपट्टी आहे.

1) आम्ही भारताचे लोक:- ह्या संविधानाची निर्मिती आम्ही सर्व भारतीयांनीच केलेली, असून त्यावर दुसरा कोणीही हक्क दाखवू शकत नाही, कोणत्या देशाने वा राजाने आम्हाला तयार करून दिलेले नाही.
2) सार्वभौम:- भारत सार्वभौम आहे, म्हणजे भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे अधिपत्य नाही, त्यामुळे भारत आपले अंतर्गत व बाह्य कारभार स्वतः करण्यास मुक्त आहे.
3) समाजवादी:- समाजाकडून निर्माण झालेल्या वस्तूवर साधन संपत्ती वर पूर्ण समाजाचा समान अधिकार असून तिचा विनियोग समाजावरच अवलंबून आहे, यात शासनाचा कोणताही हस्तक्षेप नसून जमीन व कारखान्याचे नियंत्रण व मालकी शासनाकडे असेल.
4) धर्मनिरपेक्षता:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता पाळणे, भेदाभेद करणे कायद्याने गुन्हा ठरवून कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, मात्र देशातील कोणत्या धर्माला भारताचा धर्म म्हणून घोषित करता येणार आहे.
5) लोकशाही:- लोकशाही ही वस्तुतः एक प्रकारची लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था असते, ती विषमतेला थारा देत नाही, लोकशाहीत शोषणाला थारा नसतो समाजाच्या सर्वच घटकाकडे जी समतेने ममतेने व आदराने पाहते, तीच खरी लोकशाही होय. रक्ताचा एक थेंबही न सांडवता लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन व्यवस्था म्हणजेच लोकशाही.
6) गणराज्य:- 26 जानेवारी हा दिवस गणराज्य दिन म्हणून, साजरा करण्यात येतो.कारण ज्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अर्पण केलेल्या संविधानाची अंमलबजावणी होऊन जनतेचे राज्य अस्तित्वात आले,यामध्ये वंश परंपरेला थारा नाही राज्य प्रमुख निवडून यावे लागते.
7) न्याय :- सामाजिक विषमता नष्ट करून नागरिकांमध्ये जात पात,धर्म,लिंक,भाषा,उच नीच असा कोणताच भेदभाव केला जात नाही.भारताच्या राष्ट्रपती च्या मताला जी किंमत आहे.तिची किंमत एका भिकाऱ्याची भिकाऱ्याच्या ही मत आला आहे.म्हणजेच सर्वांना समान न्याय.
8) स्वातंत्र्य :- प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केल्यामुळे प्रत्येकाला स्वतःचा विचार करण्याचा बोलण्याचा वागण्याचा व आपला विकास करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, यामध्ये कोणतेही बंधन असू नये.
9) समता:- कायद्यासमोर सर्व समान हे तत्व संविधानाचा आत्मा आहे.सामाजिक आर्थिक व राजकीय विषमता नष्ट करून एखाद्या विशिष्ट व्यक्तीची फुटभर उंची वाढविण्यापेक्षा सर्वांची इंचभर उंची वाढविणे म्हणजेच समता प्रस्थापित करणे होय.
10) बंधुता :- मला जेवढं स्वातंत्र्य हवा आहे, तेवढच ते इतरांनाही मिळाला पाहिजे, अशा भावना ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच्या मनात जागृत होईल त्यावेळेस बंधुता आपोआपच निर्माण होईल.
भारतीय संविधान ह्या राष्ट्रीय ग्रंथा बरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, रिडल्स इन हिंदुझम, थॉट्स ऑन पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ दी रुपी, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, शूद्र पूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण, जातीचे निर्मूलन, क्रांती व प्रतिक्रांती, असे अनेक ग्रंथांची निर्मिती करून हजारो पुस्तके लिहिली आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 60000 पुस्तकांचे वाचन केले होते.त्यांना जगातल्या नऊ भाषा अवगत होत्या. व्हाईस राय मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे एकाच वेळेस तीन खात्यांचा पदभार होता. मजूर मंत्री, ऊर्जामंत्री, जलसिंचन,मंत्री बांधकाम मंत्री, त्यांनी जगातल्या अन्य राज्यघटनेचा सखोल अभ्यास केला होता,बौद्ध,हिंदू ,मुसलमान, जैन,सिख, ख्रिश्चन, अशा अनेक धर्माचा त्यांचा एवढा अभ्यास होता, की कोणत्याही धर्मगुरूच्या प्रश्नाचे उत्तर अगदी विश्लेषण करून पुराव्यासहित पण डॉक्टर, बाबासाहेबांच्या प्रश्नाला उत्तर मात्र कोणताही धर्मगुरू देण्यास असमर्थ असे. डॉ बाबासाहेबांकडे जेवढ्या पदव्या होत्या तेवढ्या जगात आज रोजी कोणाकडेही नाहीत.कोणी त्यांच्या इतक्या पदव्या घेतो म्हटलं तर त्याला सात जन्मात ही ते शक्य होणार नाही.त्यांचे काही प्रबंध तर इंग्लंड,लंडन,अमेरिका,सारख्या देशाने ग्रंथरूपाने प्रकाशित केले.

विश्ववंदनीय डॉ,.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सातासमुद्रापार अमेरिका, इंग्लंड, लंडन, जपानमध्ये ज्ञानाचे प्रतीक म्हणून जगाला प्रेरणा देत,उभा आहे. डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर जर खरोखरच अमेरिका किंवा लंडनमध्ये जन्मास आले असते तर? मग म्हटले असते, का आपण” मेरा देश महान” जगातील इतर देश डॉ.बाबासाहेबांचा जो सन्मान करतात तो भारतात होतो का? भारतात तुम्ही दुसऱ्याची पुतळे कितीही उंचीची बनवा हो त्यांची उंची मात्र विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची उंची गाठुच शकत नाही. हे भारतातच काय जगातल्या इतर देशांच्या लोकांना विचारा उत्तर मिळून जाईल, संविधान दिनाच्या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचे वर्णन म्हणजे भारतीय संविधान निर्मात्यांना खरी आदरांजली!

✒️सुरेश शालिग्राम हिवराळे(मु. पो.- डिघी, ता-नादुंरा, जि-बुलढाणा)मो:-9527261559