मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे हदगांव तहसील कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन

30

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड,प्रतिनिधी)मो:-93738 68284

हदगांव-नांदेड(दि.२२नोंव्हेंबर):-मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने हदगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडी चे हदगाव तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२२नोव्होंबर रोजी मा.तहसीलदार तहसील कार्यालय हदगाव मार्फत मा.मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे

धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे.ते बिल येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून कायदा लागू करावा न्यायालयाने मान्यता दिलेले पाच टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे

संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या ह.भ.प. किर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे,
वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेल्या अवैध कब्जे
हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.

सारथी, बार्टी,महाज्योतीप्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी
या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या हदगांव च्यावतीने एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. या सर्व मागण्यांचे निवेदन मा.तहसीदार तहसील कार्यालय हदगाव मार्फत मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव,उपाध्यक्ष डी. एण.थोरात,बाबुराव टिब्बे (संघटक) अरुण वाढवे (सचिव) सुशील भालेराव ,पपू मनवर मनोज कदम,रणजित बागाटे,विलास भालेराव, भिमशाहीर ,प्रबोधनकार विद्रोही माधव दादा वाढवे,संदीप पडघने,संदीप दवणे ,रणजित कांबळे (सरपंच) दिलीप कदम ,अनिल कांबळे ,रमेश नरवाडे , सिद्धार्थ वाठोरे पत्रकार महेंद्र धोंगडे ,दिलीप ढोले,संदीप बहादूर इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..