सुदाम बताने गो. ग. पा जिवती तालुका संघटक तर गफ्फार शेख तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष पदी

🔹गो. ग. पा. युवा मोर्चा गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.22नोव्हेंबर):-येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप चे सुदाम बताने, काँग्रेस चे गफ्फार शेख यांनी गो. ग. पा. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश केला.यावेळी गो. ग. पा. जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव यांनी सुदाम बताने यांची तालुका संघटक तर गफ्फार शेख यांची अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके, गो. ग. पा. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर,प्रदेश प्रवक्ते महेबूब भाई शेख, जिल्हाउपाध्यक्ष राजे संजीव आत्राम, माजी सभापती भीमराव मेश्राम, जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, माजी सरपंच हनुमंत कुमरे, गोंडवाना गडकिल्ले संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके, निशिकांत सोनकांबळे, नगरसेवक मारोती बेल्लाळे, जमालुद्दीन शेख, उर्मिला बेल्लाळे, सत्तार शेख, आनंदराव शेडमाके, अनिता धुर्वे, राजुरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष फारुख शेख, नामदेव जुमनाके, जगेराव सिडाम आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED