बेशरम जिल्हाप्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ ताशाच्या गजरात बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरो आंदोलन संपन्न

🔹शहरातील निकृष्ट रस्त्याप्रकरण

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.22नोव्हेंबर):-शहरातील नगररोड, बार्शीनाका, जालना रोड आदि भागातील मोठमोठाली खड्डे नित्याचाच भाग झाला असून,त्यामुळे होणारे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदारांवर
संबधित प्रकरणात कारवाई करण्यात यावी यासाठी ४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनानंतर तसेच विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी जिल्हा प्रशासन आधिकारी नगर पालिका प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना निवेदनातील नमुद मुद्यांबाबत दखल घेऊन आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करून संबधितांना परस्पर अवगत करण्याबाबत आदेश दिले होते ,परंत संबधित जिल्हाप्रशासन, नगरपरिषद व ठेकेदार यांच्यात कोणतीही सुधारणा होत नसुन संबधित आधिकारी ठेकेदाराशी संगनमतानेच शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करत असल्याचे दिसुन येते.

बेशरम जिल्हाप्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरणार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
______
बीड शहरातील नगररोड, जालना रोड, बार्शी रोड आदि ठिकाणी वारंवार होणारे खड्डे लोकप्रतिनिधी व त्यांच्या ठेकेदार कार्यकर्त्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिका-यांशी संगनमतानेच डांबराऐवजी काळे तेल,डांबराचा अत्यल्प वापर, भुकटी आदि वापरून खड्डे बुजवण्यात येतात निधी उचलण्यात येतो.

तसेच अत्यल्प डांबराच्या वापरामुळे खडी रस्त्यावर पसरून दुचाकी वाहने घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र आठवडा भरातच पुन्हा खड्डे उघडे पडलेले दिसुन येतात यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग ,नगरपरिषद तसेच ठेकेदार यांना रस्त्यावरील खड्डे बुजवणे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असून संबधित आधिकारी-लोकप्रतिनिधींच्या बेशरम प्रवृतीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,यांच्या नेतृत्वाखाली भाजपा किसानसभा तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे, तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड, शेख युनुस च-हाटकर, संदिप जाधव, उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार एस.एम. युसुफभाई, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन, सय्यद आबेद सर सामाजिक कार्यकर्ते सय्यद ईलियास, आदिंनी दि.२२ नोव्हेंबर सोमवार रोजी ताशाच्या गजरात जिल्हाप्रशासन व नगरपरिषद तसेच लोकप्रतिनिधींचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील खड्डे बेशरमाच्या फुलांनी प्रतिकात्मक खड्डे भरून निषेध नोंदवत संबधित जिल्हाप्रशासन, नगरपरिषद आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन संबधित ठेकेदाराच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी करत निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांच्यामार्फत नगरविकास मंत्री, प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED