पुसेगावातील श्वान शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

28

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

पुसेगाव(ता. खटाव)(दि.24नोव्हेंबर):- येथे आयोजित केलेल्या श्वान शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडी शर्यती बंद असल्याने या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी तोबा गर्दी केली होती. 

पुसेगाव येथील शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात झालेल्या या स्पर्धेत मादी गटात सुमारे ८१ तर नर गटात ७६ श्वानांनी सहभाग नोंदवला. यात पंढरपूर, आटपाडी, माळशिरस, बारामती, मोही मार्डी, वारणा कापसी, कराड, नातेपुते तसेच खटाव, माण, कोरेगाव, सातारा, फलटण, कराड तालुक्यातील शौकिनानी श्वानासह हजेरी लावली. गेल्या आठ दहा
श्वान शर्यतीच्या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी शौकिनांनी केलेली गर्दी.

वर्षांपासून बैलगाड्याच्या शर्यतीवर. शासनाने बंदी घातली असल्याने श्वान शर्यतीना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने शर्यतीच्या आधल्या दिवशी श्वानांची धावपट्टी पावसाने भिजून खराब होऊ नये म्हणून संयोजकांनी त्यावर प्लास्टिक कागद अथांरून योग्य ती काळजी घेतली

होती. या शर्यतीत ७७ फेरे झाले. या शर्यती यशस्वी होण्यासाठी रत्नदिप मंडळ व जय हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.