कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे परळी नगरीत स्वागत!

35

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.24नोव्हेंबर):-कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय येथे “नविन राष्ट्रीय शैक्षणीक धोरण व विद्यापीठाची भूमिका” या विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. प्रमोद येवले सर यांचे व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी त्यांचे परळी नगरीत आगमनानिमित्त सत्कार संपन्न यावेळी संजयजी देशमुख,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व व्यवस्थापकीय मंडळ सदस्य डॉ.नरेंद्र काळे,अधिसभा सदस्य प्रा.डॉ.धोंडगे,माजी नगराध्यक्ष तथा अधिसभा सदस्य बाजीराव धर्माधिकारी विद्यापरिषद सदस्य प्रा.डॉ.पी.एल.कराड सर,प्राचार्य लक्ष्मण मुंडे,प्रा.डॉ.माधव रोडे,रविंद्र देशमुख प्रा.प्रसाद देशमुख प्रा.डॉ. विनोद जगतकर प्रा.राजकुमार येल्लावाड तसेच परळी व परिसरातील महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक,विद्यार्थी,शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ.प्रमोद येवले सर यांनी “नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठाची भूमिका” या विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.