संविधान वाचविण्याची जबाबदारी कुणाची ?

29

सध्या सकल जग काेराेनाच्या भयानं ग्रासलं आहे.त्यामुळे तमाम भयग्रस्त जग अचल झालंय.जग थांबलं आहे.चार भिंतीत बंदीस्त झालं आहे.काेराेनाच्या तावडीतुन सुटण्याचा हाच मार्ग असल्याचा जगाला विश्वास आहे. त्या विश्वासाला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळताे आहे. देशात अशी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली की बहुजनांच्या घातपाताचे कटकारस्थान रचले जातात. काेराेनाच्या भयानं देश चार भिंतीत बंदीस्त झाला.आणि सारं लक्ष काेराेनावर केंद्रीत झालं असतांना गाफील क्षणी सरकार घटना बदलण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आराेप श्रीमंत काेकाटेंनी केलाय.नुकताच त्यांचा व्हीडिआे वँटसअपवर पाहीला. त्यात ते म्हणतात की,राकेश सिन्हा हे राज्यसभेतील खासदार असुन ते घटनेतील धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द काढन्यासाठी खाजगी बील आणत आहेत.

हे खरेच दुर्दैवी आहे. पण त्याहुन दुर्दैव असं आहे की संविधान रक्षणाचं युद्ध एकट्या बाैद्धांनी,महारांनी लढावं , घटनेच्या नावावर त्यांनीच रस्त्यावर यावं.अगदी भावनिक व्हावं हे मला वैयक्तिक पटत नाही. वँटसअपवर सर्वत्र हा व्हीडिआे बाैद्ध बांधव माेठ्या प्रमाणावर ईकडचा तिकडे करतांना दीसतात. त्यात भावनिक असलेल्या लाेकांची संख्या भारी आहे.आणि केवल भावनिक हाेऊन प्रश्न सुटत नाही.त्यासाठी शिस्तबद्ध,नियाेजनबद्ध कार्य करण्याची आवश्यकता असते.आपण त्या दिशेनं काय ठरविलंय?

आता आपण बाैद्धेतर आंबेकवाद्यांकडे वळू..जे बाैद्ध नाहीत, महार नाहीत म्हणजे हींदु आहेत.मराठा आहेत.कुणबी आहेत.मांग आहेत.ढीवर आहेत.चांभार आहेत…..इत्यादी जाती धर्माचे लाेक आहेत.ह्या सर्वांना आंबेडकरवाद समजला असं आपण मानत आलाेत.बेंबीच्या देठापासुन आेरडुन भाषण करणारे आंबेडकरवादी आहेत असा आपला समज आहे.त्यामुळे मागील अनेक वर्षांपासुन बाैद्ध जनता अशा तथाकथीत आंबेडकरवाद्यांना डाेक्यावर घेऊन फीरते आहे.अमाेल मिटकरी,लक्ष्मण माने,मा म देशमुख,काेळसे पाटील,सुषमा अंधारे,आनंद शिदे …इत्यादी अनेक नांवं आहेत.ज्यांना आपले गायक मानताे ते आनंद शिंदे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ताे पक्ष कुणाचा?असा प्रश्न मला एका बाैद्ध भगीनीने विचारला.रिपब्लिकन चे ईतके तुकडे झालेत आणि हाेतायत की काेणत्या तुकड्याचा काेण मालक हे माझ्यासह अनेकांना माहीत नाही.लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात संविधान वाचविण्याची जबाबदारी वरिल अनेक मंडळींनी स्विकारली.आणि गमतीदार ऊपाय त्यांनी सुचविला.वरिल अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस,ईंदीरा काँग्रेसला आंबेडकरी जनतेनं पाठींबा द्यावा अशी भावनिक साद बाैद्धांना,महारांना घातली.हाेय फक्त बाैद्धांना,महारांनाच!कारण त्यांच्या जातीची माणसं त्यांचं ऐकत नाहीत.

मा .म.देशमुखांची त्यांच्या माणसांनी प्रेतयात्रा काढली आणि आमच्या माणसांनी त्यांची प्रेमयात्रा काढली. त्यांनी स्वतःचे राजकीय पक्ष स्थापना केलेत.पुरुषोत्तम खेडेकरांनी शिवराज्य पार्टी स्थापन केली.मा.म.देशमुख,सुधीर सावंत सारखी वैचारिक बाजू असणारी माणसं त्यात राबू लागली.ह्यांना राजकीय आखाड्यात रिपब्लिकन पक्ष कधी जवळचा वाटला नाही. नव्या पिढीतील मिटकरी ,अंधारे…वगैरेंना सहजिकच राजकीय स्वप्न पडु लागली.भविष्यात आमदार , खासदार बनुन पुढच्या दारातुन नाही तर मागच्या दारातुन( विधानपरिषद,राज्यसभा )प्रवेशता येईल असे स्वप्न ते बघु लागलेत, असा आशावाद ते बाळगुन आहेत.काेळसे पाटलांसह सर्वांनी रिपब्लिकन,आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळ केला.सुधीर सावंत राष्ट्रवादी काँग्रेस,इंदिरा काँग्रेस आणि भाजप सेनेला सापनाथ आणि नागनाथ म्हणतात.त्याच सापनाथ नागनाथांना त्यांच्या चेलेचपाट्यांनी साथ दीली.खरे तर वरील सर्व विचावंतांना आंबेडकरी जनतेनं माेठं केलं.निळ्या ताेरणात ही मंडळी माेठी झाली.बाैद्धांनी पैसा गाेळा करायचा आणि मानधन देऊन ह्यांना बाेलवायचं.स्टेजवर येऊन त्यांनी बुद्ध,फुले आणि बाबासाहेब सांगायचा.

आणि सत्ता बदलाची वेळ आली की सापनाथ नागनाथांच्या बाजुला जाऊन आंबेडकरी जनतेला संविधान वाचविण्यासाठी सापनाथाला (काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस) मते मागायची.अरे सापनाथ काय नि नागनाथ काय दाेनही विषारीच! मग आंबेडकरी जनतेच्या समाेर दुसराही विषाचाच पर्याय का ठेवतात? संविधान माेडणार-ताेडणार हे भय बाैद्धांच्या मनात किती दिवस भरणार? त्यानंतर अनेक वर्ष ही मंडळी राजकीय खेळ करीत राहील आणि रिपब्लिकन,बाैद्ध जनता शासनकर्ती जमात बनन्यापासुन दुर राहील. २००४ नंतर रिपब्लिकन बाैद्ध समाज काँग्रेसच्या भुलथापांना समजायला लागला. सर्व रिपब्लिकन नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पासुन दुर राहीले.अलिकडे प्रकाश आंबेडकरांना बाैद्धांनी मान्यता दीली. महाराष्ट्रातील बाैद्धेतर वंचित बहुजन समाजही आंबेडकरांच्या बाजुने ऊभा राहीला.लाेकसभेला आणि विधानसभेला मिळालेली मते तेच दर्वतात. लाेकसभेला मिळालेली मते परत वंचित कडे वळू नये म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या काळात संविधान वाचविण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याचा आव आणला. आणि निळ्या ताेरणात माेठी झालेली फाैज हेरली.सुषमा अंधारे,अमाेल मिटकरी,लक्ष्मण माने,काेळसे पाटील …..ही त्या फाैजेतील नांवं. ही मंडळी संविधान वाचविण्याची जबाबदारी म्हणून आपले काँग्रेस प्रेम व्यक्त करु लागली. आणि बाैद्ध जनतेला भावनिक साद घालु लागली .

पण संविधान वाचविण्यासाठी बाैद्धांनी किती वेळा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेला मते द्यावीत?ह्या प्रश्नाचं उत्तर वरिल मंडळींनी द्यायला हवं. बाैद्ध बंधु भगिनिंनाे केवल संविधान वाचविण्याची जबाबदारी म्हणून आपणच किती त्याग करणार?कुणब्यांच्या सवलती,मांग,ढीवर,खाटीक,चांभार,भंगी ,वडार.. ह्यांनाही संविधानच सवलती देताे.मग संविधानाप्रती त्यांची काहीच जबाबदारी नाही का? सुषमा अंधारे,अमाेल मिटकरी,माने,हे बाैद्धांच्या राजकीय चळवळीचे मारेकरी आहेत. संविधान वाचविण्यासाठी त्यांनी त्यांच्या समाजात काय जाग्रुती केलीय?मी वरील मंडळींना विचारताे आहे की,बाैद्धांनी आपला राजकीय बळी कितीदा द्यायचा? तुम्ही संविधान वाचविण्यासाठी बाैद्धांची राजकीय चळवळ कितीदा चिरडायची? बाबासाहेब १जून १९३६ च्या मुंबईतील भाषणात म्हणतात, ” जेव्हा जेव्हा म्हणून लाेकल बाेर्डाच्या किंवा म्युनिसीपालटीच्या जागेकरिता माझी शिफारिश मागण्याकरिता लाेक आलेले आहेत तेव्हा तेव्हा मी त्यांना असे सांगितले आहे की मांगाचा १२ आण्याचा माणूस पुढे आला तर महारांच्या १६ आणे किंमतीच्या माणसास मी मागे बसावयास लावीन.याच्यापेक्षा व्यापक द्रुष्टी काेणता समाज ठेवू शकेल असं मला वाटत नाही. ” आज त्याच बाबासाहेबांच्या संविधानामुळे अनेक ढीवर,मांग,चांभार,कुणबी,मराठे आमदार खासदार झालेत संविधानाप्रती त्यांची काहीच जबाबदारी नाही का?स्वतःच्या समाजासाठी ह्या लाेकांनी काय केलं?

ज्यामांगांना,ढीवरांना,चांभारांना,भंग्यांना,मराठ्यांना,कुणब्यांना……संविधान समलं बाबासाहेब,फुले शाहू महाराज समजले ते रगड मानधन घेऊन निळ्या वसत्या फीरु लागले.प्रबाेधनाचा धंदाही विहारवाड्यातच थाटु लागले.आणि आमचे बाैद्ध बंधु आणि भगनीही अतिशय भावनावश हाेऊन ह्यांना बाेलावु लागले.मी तमाम बाैद्धांना विनंती करताे आहे की,ह्यानंतर वरिल मंडळींना मानधन देऊन आपल्या मंचावर बाेलावनं बंद करा. आपल्यात चांगल्या वक्त्यांची कमी नाही.त्यांना मान द्या . संधी द्या.आपल्यात अनेक अभ्यासु लाेक आहेत.

संविधानावर विश्वास,प्रेम असणार्या आणि फुले,शाहु आणि बाबासाहेबांवर प्रेम असणार्या वरिल मंडळींवर आंबेडकरी समाजाचं प्रेम आहे.पण संविधान वाचविण्याची जबाबदारी एकट्या बाैद्धांवर टाकु नका.संविधानाचं महत्व तुम्हाला समजलं तर तुमच्या समाजात जाऊन सांगा. फुले ,शाहू महाराज,आंबेडकर ह्यांच्या विचारांनी प्रेरित झाला असाल तर त्या विचारांचा प्रबाेधनाच्या नावावर धंदा करु नका.ते विचार आपल्या समाजापर्यंत पाेहचवा. राहिला प्रश्न संविधान वाचविण्याचा तर तुमच्या समाजातील तुम्ही ५० लाेक काढा आम्ही १०० च्या संख्येत येऊ. आपण सारे भाऊ आहाेत.त्यामुळे संविधान वाचविण्याची जबाबदारी एकट्या भावाची नाही .सर्वांची आहे. म्हणून सत्ताबदल महत्वाचा आहे. नागनाथांच्या ऐवजी सापनाथाला आणने म्हणजे परिवर्तन नाही.तुमचे ५० आणा आम्ही १०० तयार आहाेत.चला परिवर्तनाच्या दिशेने वंचित कडे जाऊयात……

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*********************
✒️राजू बाेरकर(लाखांदुर,जि भंडारा)मो:-७५०७०२५४६७
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏