ग्रामपंचायत कार्यालया मध्ये भारतीय संविधान दिन साजरा

49

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.27नोव्हेंबर) तालुक्यातील डोंगरगाव येथिल ग्राम पंचायत कार्यालया मध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

सर्व प्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.हा कार्यक्रम सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य आणि ऑपरेटर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच सौ. मामताबाई विनोद शिंदे, उपसरपंच सौ. भीमाबाई कैलास ढेपे, सदस्य सौ. वेणुताई सर्जराव शिंदे, सौ. मिनाक्षी भगवान ढेपे, सदस्य दुर्गा अरविंद ढाकरे, साहेबराव शिरभिडे, गजानन गावंडे, ग्रा.पं ऑपरेटर राहूल काळबांडे, अमोल ढेपे, गौतम सावतकर ग्रा.पं कर्मचारी व तसेच बरेच गावकरी मंडळीउपस्थित होते.