शेतकरी आत्महत्या संख्येत इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र नंबर एक वर असल्याचे केंद्रीय अहवालात दिसून आले आहे – किसान पुत्र श्रीकांत गदळे

68

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2डिसेंबर):- देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वा जास्त आत्महत्या ह्या महाराष्ट्रात झाल्याअसल्याचे केंद्रीय अहवालात समोर आले आहे. त्यामध्ये मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात महाराष्ट्र एक नंबर वर आलेला आहे.वर्षे 2020 मध्ये देशात 5600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या 2020 या वर्षात झालेल्या आहेत. एकूण आत्महत्येचा संख्येपैकी तब्बल 50 टक्के आत्महत्या ह्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत.2020 मध्ये आत्महत्या करण्याची कारणे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नसल्यामुळे अतिवृष्टी मुळे पिकलेला माल घरी आणता आला नाही. सावकारी कर्ज चे ओझे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढलं आहे.

सतत ओल्या दुष्काळामुळे पीक विमा कंपनी, राज्य सरकार कडून कोणतीही मदत नाही. उभी पिके शेतात वाळून जात आहेत, शेतातील वीज कनेक्शन देखील कापण्यात आलेत.वर्षे 2020 मध्ये द्राक्ष बागायतदार शेतकरी सुद्धा आत्महत्या करून लागलेत. ठाकरे सरकारची शेती आणि शेतकऱ्याप्रति असलेली उदासीनता हे कारणे जाहीर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा पाणी मुबलक लाईट मोफत अशा अनेक शेतकऱ्यांना सरकारने सवलती द्यावेत ज्याने करून शेतकरी आत्महत्या प्रवृत्त होणार नाहीत. अशी मागणी केली आहे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे…