ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राहणीमान भत्ता व वाढीव मानधन मागणीसाठी गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण

38

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2डिसेंबर):-पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण केले आहे.या दरम्यान तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीला पंधरा वित्त आयोगाच्या निधिप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रहाणीमान भत्ता देखील येत असतो मात्र कर्मचाऱ्यांना रहाणीमान भत्ता मिळत नाही.

त्यामुळे या उपोषणादरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रहाणीमान भत्ता व वाढीव मानधन देण्याची प्रमुख मागणी घेऊन कर्मचारी उपोषणाला बसले होते.पाहुयात काय मागणी केलीये कर्मचाऱ्यांनी.