लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

64

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2डिसेंबर):-दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे जगभरातील अनेक देशात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यास सुरूवात झाली आहे.
यातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. टोपे यांच्या विधानामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जालना येथे पत्रकारांशी टोपे यांनी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनानुसार देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस घेतलेले असताना RTPCR चाचणी बंधनकारक असणार नाही.धोकादायक असणाऱ्या देशांतून आलेल्यांना मात्र RTPCR चाचणी बंधनकारक असणार आहे. तसेच त्यांना 7 दिवस क्वारंटाईन राहणे बंधंनकारक असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी घट पाहण्यास मिळत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता राज्यातील काही ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात धोका असलेल्या देशांतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून त्यात जर कुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.राज्यात पहिल्या डोसचे लसीकरण 82 टक्के झालं असून दुसऱ्या डोसच 44 टक्के लसीकरण झालं आहे.साडेसात कोटी लोकांना लसीचा पहिला डोस दिला असून साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला देण्यात आला अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.