मुलगंधकुटी बौध्दविहार हदगाव येथे बक्षिस वितरण समारंभ संपन्न

  45

  ✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड)मो:-9373868284

  हदगांव(दि.3डिसेंबर):-शहरातील मुलगंध कुटी बुद्ध विहार नागसेन नगर व नवयुवक मित्र मंडळ नागसेन नगर हदगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने २६ नोव्हेबर संविधान दिनानिमित्ताने विहारात संविधानावर आधारित परिक्षा घेण्यात आली होती दिनांक २ डीसेंबर रोजी बक्षिस वितरण समारंभ मुलगंध कुटि बुद्ध विहार हदगांव येथे संपन्न झाला.या परीक्षेसाठी वयानुसार दोन गट तयार करण्यात आले छोटागट व मोठा गट असे दोन पेपर काढण्यात आले.छोट्या गटात वैभवी नरवाडे हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे तिला बक्षिस म्हणून भारतीय संविधान व २०० रु तर समिक्षा गायकवाड‌ हिस बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देण्यात आला हीने व्दितीय क्रमांक पटकावला आहे तिसरा क्रमांक चार मुलांनी समान गुण घेतले त्या चारही मुलांना समान बक्षिस वितरण करण्यात आले.

  मोठ्या गटात अंजनाताई रगडे(वाठोरे) हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांना बक्षिस म्हणून भारतीय संविधान व ३००रुपये तर व्दितीय क्रमांक कृतिका इंगोले हिला बक्षिस म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म बक्षीस म्हणून देण्यात आले

  छोट्या गटात एकूण सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यात यश लोकडे प्रणव राऊत, समृध्दी जाधव मोनिका जाधव प्रणाली वाठोरे, वैभवी नरवाडे, सम्यक हनवते , सम्यक दामोदर, समिक्षा गायकवाड ,सोहम इंगोले, आदित्य घुगरे संघर्ष पाईकराव, शैलजा कदम, रिया डाखोरे रंजीत बनसोडे, सोनाक्षी बनसोडे .
  मोठा गट निखिल दवने,प्रांजली इंगोले, किर्ती इंगोले, इंगोले मयुरी, सांची कोल्हे , अवचार तक्षशीला , नंदकुमार बहादुरे हरणे लक्ष्मण , कांबळे पुजा, वैशाली खडसे , रगडे अंजली राऊत यशोदा, इंगोले कृतिका , रायठक संकेत , शिंगनकर साहिल…

  या गटात पहिला क्रमांक अंजनाबाई वाठोरे रगडे दुसरा क्रमांक कृतिका इंगोले तर तिसरा क्रमांक निखिल दवने
  प्रस्तुत परिक्षेसाठी मायाबाई सदाशिव मुनेश्वर सर यांच्या कडून मोठ्या गटांसाठी पहिलं बक्षीस 300रुपये तर बाल गटासाठी 200रुपये बक्षिस ठेवण्यात आले होते.

  तर तिसरे तीन आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस चंद्रमणी नरवाडे साहेब , अँड. धम्मपाल पाईकराव सर , व राहुल वाठोरे सर व प्रा डॉ बि.एम नरवाडे सर यांच्या कडून तिसरं बक्षीस देण्यात आले…..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुलगंधकुटी बुद्ध विहार नागसेन नगर हदगावचे राहुल वाठोरे सर ( अध्यक्ष , मुलगंध कुटी बुद्ध विहार नागसेन नगर हदगाव), जयपाल जमदाडे ( सचिव ), अमोल नरवाडे सर ( कोषाध्यक्ष ), जय पंडित ( सहसचिव ), आर्यन शिनगारे ( महासचिव ), निहार शिंगनकर ( सदस्य ), सदेंश रायठक ( सदस्य ), प्रा. डॉ. बि. एम. नरवाडे सर ( निधी सल्लागार ), अँड. धम्मपाल पाईकराव सर ( विधी सल्लागार ) महेंद्र पाल बनसोडे,पंकज रणवीर सर,व सिध्दार्थ डाखोरे सर यांनी सुध्दा सहकार्य केले.