आष्टीत दिव्यांगांचा सन्मान करुन मराठी पत्रकार परिषदचा वर्धापन दिन साजरा

36

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.3डिसेंबर):-मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार मराठी पत्रकार परिषद संलग्न आष्टी तालुका युवा पत्रकार संघ यांच्या वतीने मराठी परिषदेचा वर्धापन दिन असल्याने दिव्यांगांचा सन्मान करून दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला.यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व डाॅ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग सेलचे प्रदेश सरचिटणीस शिरीष थोरवे,मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

दिव्यांग दिनानिमित्त शिरीष थोरवे,राजकुमार थेटे,पत्रकार आण्णासाहेब साबळे,विक्रम आटोळे,अशोक गायकवाड,राजू देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.पत्रकार बांधवांच्या आरोग्याची तपासणी करुन मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,सचिव अविशांत कुमकर,निसार शेख,यशवंत हंबर्डे,संजय खंडागळे,जावेद पठाण,मनोज पोकळे,किशोर निकाळजे,संतोष नागरगोजे,शहानवाज पठाण,अमर हजारे,तुकाराम भवर,अक्षय विधाते आदी उपस्थित होते.