बीडचं राजकीय चित्र बदललं; नव्याने 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती सदस्य संख्या वाढली!

58

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.9डिसेंबर):- जिल्ह्यात नव्याने 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गण वाढणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने हे जाहीर केलं आहे. जिल्ह्यात नवीन रचनेनुसार जिल्हा परिषदेत 69 गट असणार आहेत. तर प्रत्येक गटात 2 पंचायत समिती गण असतात. त्यामुळे तालुक्यातील गट संख्येच्या दुप्पट संख्या त्या तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांची असणार आहे. जिल्ह्यात 9 जिल्हा परिषद गट वाढले असून शिरूर आणि धारूर तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती गण वाढणार आहेत.

नव्या रचनेनुसार आष्टी 8, पाटोदा 4, शिरूर 4, गेवराई 10, माजलगाव 7, वडवणी 3, बीड 9, केज 7, धारूर 3, परळी 7 आणि अंबाजोगाई 7 असे गट असणार आहेत. यामुळे वाढवण्यात आलेले जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची नावे लवकरच जाहिर होणार आहेत. तर नवीन गट व गण निर्मितीमुळे अनेकांचे नियोजन कोलमडणार आहे. अनेक नवख्याना संधी देखील मिळण्याची शक्यता आहे.