पुसद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पूर्णाकृती पुतळा सुशोभीकरण, व शेजारील अतिक्रमण विषयाच्या अनुषंगाने बैठक संपन्न

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.9डिसेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रज्ञापर्व २०२१ च्या वतीने दि.८ डिसेंबर रोजी संभाजी नगर बुद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा सुशोभीकरण व अतिक्रमण या दोन विषयावर चर्चा करण्यात आली .

पुसद शहरातील, सध्या परिस्थिती मुख्य बाजारपेठेत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला आहे, पुतळ्याच्या अवतीभवती अनेक भाजी विक्रेते, रस्त्यावर बसून अनेक वस्तू विक्रेते विकताना आपल्याला दिसतात पुतळ्यापासून चारही दिशेला दुकानांचे अतिक्रमण झालेले आहे हे अतिक्रमण काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा स्मारक, नांदेड, पुणे, अशा मेट्रोसिटीच्या धर्तीवर पुतळ्याचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, व्हावे अशी संपूर्ण समाज बांधव व आंबेडकरी अनुयायी, यांची तीव्र इच्छा आहे. त्या दृष्टीने लवकरात लवकर अतिक्रमण काढून पुतळा असलेल्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे सुशोभिकरण व्हावे या प्रमुख विषयाच्या अनुषंगाने संभाजी नगर बुद्धविहार येथे बैठकीचे आयोजन केले होते.

पुतळा निर्माण झाला तेव्हापासून आजतागायत कुठल्याही प्रकारचे चांगल्या दर्जाचे सौंदर्यीकरण झाले नाही, येणाऱ्या १४ एप्रिलच्या आतील काळात संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण व्हावे या करिता सर्व उपस्थित मान्यवरांनी पुतळा सौंदर्यीकरण, व अतिक्रमण या दोन्ही विषयावर आपले मत व्यक्त केले व सर्वानुमते पुतळा सौंदर्यीकरण व अतिक्रमण या दोन्ही विषयाला सर्व समाज बांधवांनी सहमती दर्शविली .

कार्यक्रमाला उपस्थित, ज्येष्ठ समाज बांधव, प्रज्ञापर्व माजी,-अध्यक्ष, तथा दलितांचा कैवारी संपादक,भीमराव कांबळे, प्रा.विलास भवरे, विठ्ठल खडसे सर, दैनिक महासागर तालुका प्रतिनिधी बाबाराव उबाळे, रिपाई (आठवले) शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, भिम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष किशोर कांबळे,रिपब्लिकन वार्ता न्यूज जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले, दैनिक सिटी न्यूज,कैलास श्रावने, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, नगरसेवक भगवान धुळे, भीमशक्तीचे संतोष अंभोरे, भारतीय बौद्ध महासभा शहाराध्यक्ष ल.पू .कांबळे, विशाल डाके, सामाजिक कार्यकर्ता मुन्ना हाटे, वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता गजू धाबे, नितेश खंडारे, क्राईम न्यूज पत्रकार प्रतिनिधी खांडेकर, समता सैनिक दलाचे नरेंद्र पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रसाद खंदारे, दैनिक लोकसूत्र प्रकाश खिल्लारे, विक्रांता डाके, प्रणव भगवत, रणजित कांबळे, तेजस वाढवे, बिपिन हरणे, व, प्रज्ञापर्व अध्यक्ष २०२१ बुद्धरत्न भालेराव आधी समाज बांधव उपस्थित होते.