वंचित बहुजन आघाडी बीड तालुका अध्यक्षपदी किरण वाघमारे यांची निवड

34

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.9डिसेंबर):-बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणीच्या निवडी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी नुकत्याच जाहीर केल्या.बीड तालुका अध्यक्ष पदाची धुरा भारिप बहुजन महासंघा पासून पक्षात कार्यरत असणारे किरण वाघमारे यांच्या वर सोपवण्यात आली.किरण वाघमारे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शेकडो कॉर्नर बैठका घेऊन प्रचार केला.तसेच पक्ष वाढिसाठी मेहनत घेतली. बीड तालुक्यात गाव तिथे शाखा व घराघरांत कार्यकर्ता अभियान राबवून सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणावर करून घेतली. वाघमारे यांच्या योगदानाची पक्ष श्रेष्ठींनी दखल घेत त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली.

वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे जिल्हा पक्ष निरीक्षक धम्मानंद साळवे व अंकुश जाधव यांनी मुलाखती घेऊन पक्ष कार्यालयाकडे अहवाल पाठवला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी नुकतीच बीड तालुकाध्यक्षपदी किरण वाघमारे यांची निवड घोषित केली.

वाघमारे यांच्या निवडीने बीड तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचे मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे व जिल्हा कमिटी मधील सर्व पदाधिकारी, युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू देवकते,पक्षाचे ज्येष्ठ नेते वैभव स्वामी, विष्णू जाधव डॉ. नीतीन सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ.गणेश खेमाडे, यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सत्कार करून अभिनंदन केले.तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.