इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी सय्यद मिनहाजोद्दीन

    35

    ?पत्रकारांच्या न्यायासाठी लढणार इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन-सय्यद मिनहाजोद्दीन

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    गेवराई(दि.9डिसेंबर):-इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार व मराठवाडा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या सहमतीने राष्ट्रीय संघटन सचिव अखिलेश्वर धर द्विवेदी यांनी बीड येथील पत्रकार व बीड संदेशचे प्रतिनिधी सय्यद मिनहाजोद्दीन यांची बीड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.सय्यद मिनहाजोद्दीन यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की शहर व गावातील पत्रकारांना इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनशी जोडून पत्रकार हितांचे रक्षण व अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवावा. सय्यद मिनहाजोद्दीन यांनी सांगितले की पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन लढणार आहे.

    सय्यद मिनहाजोद्दीन यांच्या नियुक्तीबद्दल मोहम्मद परवेज़ (राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष), इरफानुल्लाह खान व गिरिराज सिंह (राष्ट्रीय महासचिव), सलमान अहमद व मोहम्मद एजाजुल (राष्ट्रीय काउंसिल सदस्य), रंजीत सम्राट (बिहार प्रदेश अध्यक्ष), मो. सुल्तान अख्तर, नसीम रब्बानी, के. एम. राज, सय्यद जाकिर हुसैन (विदर्भ प्रदेश अध्यक्ष, मी मराठी), असलम कुरेशी (मराठवाडा प्रदेश अध्यक्ष इंडियन जर्नलिसस्ट असोसिएशन, टाईम्स अपडेट न्यूज), ज्ञानेश्वर आढाव (दैनिक सामना), योगेश बनकर (झी 24 न्यूज लाईव्ह), फारूख शेख जिल्हा अध्यक्ष जळगांव (दैनिक लोकशाही), अहमद नूर कुरेशी (लोकमत टाईम्स), अश्फाक पटेल (लोकतांत्रिक जंग), सैय्यद वाजेद (दैनिक जगमित्र), देवेंद्र भोंडे (इम्पैक्ट 24 न्यूज), गणेश शिंदे (दैनिक पुण्यनगरी), शेख रहीम (दैनिक पुण्यनगरी), अविनाश घोगरे (दैनिक पुढारी), शेख मुश्ताक (दैनिक कालदंड), हाफिज़ शबाब बागवान (दैनिक जगमित्र), उत्तम जाधव (दैनिक लोकमत), शकील अहमद (परभणी जिल्हा अध्यक्ष इंडियन जर्नलिसस्ट असोसिएशन), ॲड सय्यद अज़िम (बीड संदेश), ॲड साजेद (सरकार एक्स्प्रेस), मोईज़ राज़ (बीड विशेष), मोईज़ बेग (मराठवाडा आदर्श), ज़ुबेर (महाराष्ट्र शान), अतीक इस्माईल मोमीन (बालाघाटचा योध्दा) आदींनी अभिनंदन केले.