प्रत्येकात अलौकिक गुण असतो

31

काळाच्या पाठीवर स्वार होऊन जीवनाचा काळ बदलवायचा असेल , तर आधी स्वतःला पारखता आले पाहिजे . माझ्याकडे काहीच नाही . मला हे जमणार नाही . ही न्यूनगंडाची भावना यशाच्या मार्गातील पहिला अडथळा आहे . तो काय सांगतो ? मी त्याला चांगला ओळखून आहे . असे म्हणणारा प्रत्येकजण स्वतःला ओळखेल आणि पारखेल त्या दिवसापासून त्याच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात होईल , ही काळ्या दगडावरची रेषा आहे . त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त आहे . माझ्यापेक्षा तो अधिक अभ्यास करतो . जास्त बुद्धिमत्तेचा असल्याने त्याच्यासमोर माझा टिकाव लागणार नाही . अशा एक ना अनेक प्रकारच्या तुलना मनातून खच्चीकरण करीत जातात . माणसाचा पहिला पराभव त्याच्या मनात होतो . हीच पराभूत मानसिकता जीवनात गटांगळ्या खायला लावते . म्हणून आपली तुलना इतरांशी न करता स्वतःशी केली पाहिजे .

कोणताही विक्रम हा पहिल्यांदाच बनत असते . नंतर तो मोडल्या जातो . तेव्हा आपला विक्रम आपणच तोडण्यासाठी झटले पाहिजे . जे करीन ते उत्तमच करीन . माणूस म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येकात काहीना काही उणीव असणार . त्या उणिवांचा बाऊ न करता आपल्यात जे उत्तम आहे , ते शोधून नव्या सर्जनाचा रणशिंग फुंकत विजयमाळ सर केली पाहिजे . सचिन तेंडुलकर उंचीने कमी होता म्हणून तो कुढत बसला नाही . कमी उंचीचा फायदा उठवत त्याने उहँड करायची असेल तर नकारात्मकता सोडून सकारात्मकतेचे बीज पेरण्याची गरज आहे . आपल्या भूमीत कोणते पीक उगवणार याचे परीक्षण ज्याचे त्यालाच करावे लागेल . नाहीतर धुरे फोडून शेत हडपण्याचे कारस्थान नवे नाही .

आपल्या अंगी कोणते गुण आहेत , याची जाणीव जिवंतपणाचे लक्षण . असलेल्या सुप्त गुणांची झलक कोणाला लवकर दिसते . ते यशोशिखराचे मुकुटमणी ठरतात . कोणाला स्वतःच्या हुन्नरीची चाहूल हळूहळू लागते आणि घेतलेल्या वेगाची घोडदौड इतरांना तोंडात बोट टाकायला भाग पाडते . तर कोणीकोणी चार लोकांच्या खांद्यावर शेवटची यात्रा करूनही त्यांच्यात काय दडलेला होता याचा मागमूसही लागत नाही . त्या कपाळकरंट्याचे आयुष्य दुःखाचे पोवाडे गाण्यात वाया गेलेले असते . नशीब घेऊन जन्माला येत नाही . कर्तृत्वाने नशीब घडत असते . कर्तुत्वाला अलौकिक गुणांची सांगड घालता आली तर सोन्याहून पिवळे । प्रत्येकजण बावनकशी सोनाच असतो . सोन्याची पारख करण्याची दृष्टी प्रत्येकाला प्राप्त होण्यासाठी चकचकीत आरसा मिळायला हवा . धूसर आरशाने कित्येकांच्या प्रतिमा विद्रुप दाखवलेल्या आहेत.

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१