आसुर्ले पोर्ले येथील महाविद्यालयात (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

32

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.11डिसेंबर):-देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांचे पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ लष्करी अधिकाऱ्यांचा तामिळनाडूतल्या निलगिरी जिल्ह्यात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना कोल्हापुरातील पन्हाळा येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आसुर्ले पोर्ले येथे मेणबत्त्या प्रज्वलित करून, २ मिनिटे स्तब्धता ठेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे प्रमुख सुभेदार मेजर आर एस पाटील, योद्धा कमांडो रेस्क्यू फॉर्सचे कोल्हापूर जिल्हा अधिकारी सुरेश राठोड, हवालदार एस. बी. जांभिलकर, डॉ.जितेंद्र यशवंत, संस्थेचे सहसचिव प्रा.ए.ए.घाडगे सर, मानद सचिव एस एस पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही.बी.तळेकर, प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक व हुतात्मा नंदकुमार पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रा.एस.डी.कुंभार, महाविद्यालयाच्या नॅक को ओर्डिनेटर सहा.प्रा.आर.एस.पाटील मॅडम, महाविद्यालयाचे नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी कु.धनश्री चौगुले, पंकज करवंजे, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी मुरलीधर कुलकर्णी यांच्यासह विद्याशाखांचे प्राध्यापक, शिक्षक, योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्स चे सर्व कमांडो, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे छायाचित्र सहा.प्रा.पी.आर.काळे व राहुल पाटील यांनी केले.