प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा आदर्श वाढदिवस

33

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.11डिसेंबर):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रणजीत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील आशा स्वयंसेविकांना साड्या वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी आपला वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक उपक्रम,आरोग्य शिबीर, फळं वाटप, अन्नधान्य वाटप, दिव्यांग मुलांना विविध वस्तू भेट, अनाथ मुलांना आवश्यक साहित्य, वृद्धाश्रमातील परिवाराना कुटुंबाचा आधार देत वाढदिवस साजरा करतात ही संघटनेची कौतुकास्पद बाब आहे.संघटनेची परंपरा कायम ठेवत पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रणजित मोरे यांनी कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कराड शहरातील आशा स्वयंसेविकांना साडी वाटप करून आपला अनोखा वाढदिवस साजरा केला आहे.

या विशेष व उल्लेखनीय वाढदिवसाबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रवीण राठोड, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत ताद लापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नंदू पगार, संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.