गडचिरोली -उमरी जवळ भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार

32

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)

चामोर्शी(दि.11डिसेंबर):-नियतिचा खेळ आजपर्यंत्न कुनालाही कळला नाही परंतू आज जे घडले ते धक्कादायकच ठरले दवाखाण्यातून उपचार करुन परत घर वापसी करतांना काळाचा आघात होईल असे कुनिलाही वाटले नाही मात्र शेवटी नियतिने खेळ केला आणि तिघा़ना जीव गमवावा लागला अशी घटना आष्टी जवळील उमरी गावाजवळ घडली. मार्गावरील आष्टी पासून ६ किलोमीटर असलेल्या उमरी गावाजवळ ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
आठ डिसेंबर बुधवारला दुपारी साडेतीन च्या सुमारास गडचिरोली वरूनआष्टी कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक AP 16 TY 6822 याने आष्टी कडून कोनसरी कडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 33 Y 4295 ला जबर धडक दिली यात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले.

मृतकात सूरज बालाजी कुसनाके वय 35 रा मुधोली ता चामोर्शी जि गडचिरोली ललिता नितेश कुसनाके वय 25वर्ष रा मुधोली रिठ ता चामोर्शी जि गडचिरोली रितिका नितेश कुसनाके वय 4 वर्ष रा मुधोली रिठ ता चामोर्शी जि गडचिरोली यांचा समावेश आहे.यामध्ये ललिता कुसनाके व रितिका ही आई आणि मुलगी असून सूरज हा ललिता कुसनाके यांचा दिर आहे.

सूरज कुसनाके आपल्या वहिनी व पुतणीला गोंडपीपरी येथे दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेला होता होते. उपचार घेऊन स्वगावी परतत असताना काळाने कुसनाके कुटूंबीयावर घाला घातला.हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकी 4 वर्षोय रितिका चा मेंदू अक्षरशः बाहेर निघाला तर दुचाकी जळून खाक झाली. कुसनाके कुटूंबियावर घडलेल्या या दुःखद प्रसंगामुळे मुधोली रिठ वासीयांवर शोककळा पसरली आहे.