नव्याने दाखल झालेल्या पोलिस अधीक्षक यांनी गुन्हेगारीचे कायमचे करावं उच्चाटन

30

🔺नवीन नाशिक मधील गुन्हेगारी रोखण्यासाठी अंबड पोलिसांसमोर मोठे आव्हान,.

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11डिसेंबर):-सिडको भागातील अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असून मध्यत॑रीच्या काळात काही प्रमाणात पोलिसांनी कठोर पावले उचलल्याने नवीन नाशिक सिडको भागातील काहीसे शांत झालेले वातावरण पुन्हा अशांत होऊ लागले आहे . टवाळखोर , मद्यपी भाईगिरी , टोळक्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने यांना वेळीच ठेचण्याचे आव्हान पोलिस ठाण्याच्या नव्या वरीष्ठ पोलीस अधीक्षक यांचे समोर उभे राहिले आहे . पोलिस आयुक्तालयातील सर्वात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सिडकोतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच या पोलिस ठाण्याच्या हद्दीचे विभाजन करण्यात आले . इंदिरानगर व मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही भाग अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला .

गुन्हेगारांचा बिमोड सिडकोतील गुन्हेगारी रोखण्याचे अंबड पोलिसांसमोर आव्हान सोपे होईल असे वाटत असतानाच सिडको भागातील गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सर॑गल यांच्या नेतृत्वाखाली उपआयुक्त डॉ डी एस स्वामी यांच्या सह अनेक अधिकारी यांनी वेगवेगळ्या उपक्रम राबविले व गुन्हेगारीवर जरब बसवत नियञण मिळवलं होतं.ह्या धडाकेबाज पोलिस अधिकारी यांच्या बदल्या होताच सिडको भागातील गुन्हेगारीचा आलेख पुन्हा परीस्थिती जैसे थे व्हायला सुरुवात झाली.आता नव्याने दाखल झालेल्या पोलिस अधीक्षक अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन बध्द काम न केल्यास पुन्हा एकदा सिडको भागातील गुन्हेगारीचा आलेख वाढेल अशी भिंती सर्व सामान्य नागरिकांना वाटत आहे.सिडको भागातील टवाळखोराचा उपद्रव अतिशय ञासदायक आहे छोटे-मोठे गुन्हे , हाणामारीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून अल्पवयीन मुलांचा वापर करून घेतला जात आहे. अल्पवयीन काळात जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने शिवाय भाईगिरीच्या नादात अनेक मुले तसेच युवक गुन्हेगारीकडे वळत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे .

रस्त्यावरील हाणामाऱ्या , सोनसाखळी चोरी , मुली व महिलांची छेडछाड रोजच घडत आहेत . हाँटेल, चायनीज पदार्थ हातगाडी, याठिकाणी विनापरवानगी मद्यपान करू दिले जाते शिवाय चायनीज पदार्थ, हातगाडी पानटपरी जणू काही स्मोकिग झोन बनले आहेत याठिकाणी पोलिस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.उतमनगर चा परीसर महाविद्यालय परिसर व आजुबाजूच्या गल्ली ,बुरकुले हाॅल ,डिजीपीनगर पुल, पवननगर,राजे संभाजी महाराज स्टेडियम,लेखानगर भाजी बाजार, शिवशक्ती चौक नवजिवन स्कुल धन्वतरी काॅलेज परीसरात टवाळखोराचे अड्डे झाले आहे