वाहतूक नियम पाळा, नाहीतर गपचूप दंड भरा…

26

🔹आपली चूक असताना पोलिसांशी वाद घालत बसू नका-पोलिसाना सहकार्य करा..

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.15 डिसेंबर):-सध्या आपल्या सरकारने वाहतूक चलन (दंड) बऱ्याच प्रमाणात वाढवला आहे, हा दंड सामान्य नागरिकांना भरणे अशक्य आहे, त्यामुळे नागरिक आणि पोलिस यामध्ये वाद वाढत आहे, पण हा दंड सरकारने वाढवला आहे, पोलिसांनी नाही, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, म्हणजे पोलीस नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाले वर जो E-chalan मशीन द्वारे दंड आकारतात तो सरकार जमा होतो, आणि नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाला की दंड आकरण्याचे काम सरकारने पोलिस ना दिले आहे, त्यामुळे एक तर वाहतूक नियम पाळा, नाहीतर गपचूप दंड भरा, पण आपली चूक असताना पोलिसांशी वाद घालत बसू नका, त्या पोलिसांना दिवसभरात आपल्यासारख्या किती तरी नागरिकांना तोंड द्यावे लागते, त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यासाठी आपल्याला दंड भरावा लागू नये याकरिता वाहतूक नियम पाळा असे पोलिस विभागाकडून सर्व जनतेला कळविण्यात येत आहे. काही नियम व अटी लागु करण्यात आले आहेत,

1) आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर सर्वप्रथम काढून घ्या, त्याशिवाय गाडी चालवू नाका
2) टू व्हीलर वर जाताना गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट घाला, आणि शक्य झाले तर गाडीमागे बसणाऱ्या व्यक्ती ला ही हेल्मेट घालायला सांगा
3) गाडी चालवताना आपल्या गाडीची कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, सोबत बाळगा
4) गाडीचा इन्शुरन्स अद्ययावत ठेवा, संपला असेल तर पुन्हा अपडेट करून घ्या
5) आपली गाडी शकतो दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी देऊ नका, आणि जर द्यावीच लागली तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का ते चेक करा,
6) आपल्या टू व्हीलर वर तिसरा व्यक्ती बसवू नका
7) आपली गाडी जर आपण एखाद्या व्यक्तीला विकली असेल किंवा विकत असाल तर ती गाडी त्या व्यक्तीने त्याच्या नावावर करून घेतली आहे का ते पहा, कारण जर ती गाडी तुमच्याच नावावर राहिली तर त्या गाडीवर पडणारा ऑनलाइन दंड आपल्या नावावर आपल्या घरच्या पत्यावर येणार,(वाहतूक कोर्ट चे पत्र आपल्या घरी येणार)
8) लहान मुलांना गाडी चालवण्यास देऊ नका, जोपर्यंत मुलगा ड्रायव्हिंग लायसन्स काढायच्या लायकीचा होत नाही, तोपर्यंत त्यास गाडी चालवण्यास देऊ नका,
9) गाडी चालवताना सिग्नल कटिंग करू नका, सिग्नल ला कॅमेरा असतो, आपल्या वाहनावर cctv कॅमेरा मार्फत दंड पडतो, आणि आपल्या गाडी नंबर वरून आपल्या घरच्या पत्यावर (मोटार कोर्टाचे) दंड आकारण्याबाबत पत्र येते,
10) सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग वर वाहन थांबवू नका,
11) लाल सिग्नल लागते वेळी गाडीचा वेग वाढवू नाका, पिवळा सिग्नल लागताच गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवा,
12) जवळचा रस्ता पडेल म्हणून उलट्या दिशेने (wrong side) ने वाहन नेवू नका,
13) गाडी नो पार्किंग एरिया किंवा फुटपाथवर पार्क करू नका, पार्किंग असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करा.
14) गाडी चालवण्या आगोदर गाडीच्या टायर मधील हवा आणि पेट्रोल चेक करा, कमी असेल तर भरून घ्या,
15) वेळीच गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या म्हणजे गाडी रस्त्यात कधी बंद पडू नये याची काळजी घ्या
16) जड वाहतूक दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या रोड ने घेऊन जावा,
17) फोर व्हीलर, किंवा मोठी गाडी चालवताना नेहमी सीट बेल्ट चा वापर करा
18) गाडीची नंबर प्लेट फॅन्सी असेल किंवा तुटलेली असेल तर ती बदलून टाका, व्यवस्थित मोठ्या अक्षरात गाडी नंबर दिसेल अशी नंबर प्लेट गाडी ला लावा
19) खाजगी गाड्यावर पोलिस किंवा इतर काही मजकूर लिहू नका,
20) आपल्या वाहनाला दोन्ही बाजूला आरसे आसने गरजेचे आहे
21) आपल्या वाहनाला कर्कश्य हॉर्न बसवू नका
22)फोर व्हीलर ला डार्क काळ्या काचा बसवू नका,
गाडीमधील माणूस बाहेरच्या व्यक्तीला दिसेल अशी काच बसवावी
23) गाडीची फ्रंट लाईट आणि बॅक लाईट आणि पुढील व मागील इंडिकेटर बंद असेल किंवा तुटलेले असेल तर ते दुरुस्त करून घ्या
24) गाडीवर किंवा गाडीमध्ये बसून राहून गाडी रस्त्यावर थांबवून मागून येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण करू नका
आपण जर वरील सर्व नियम आपल्या वाहनांच्या बाबतीत पाळत असाल तर आपल्या हातून कधीही वाहतुक नियमांचा भंग होणार नाही, आणि आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही, जर आपण कोणताही नियम मोडला तर वाहतूक पोलिसांना दोष देऊ नका, मुकाट्याने दंड भरा, आणि गप निघून जा, आणि यावेळी दंडाची रक्कम सरकारने बऱ्याच प्रमाणात सरकारने वाढवली आहे, ती रक्कम सामन्य नागरिकाला भरणे कठीण वाटते,
त्यामुळे आपण आपले वाहन योग्य रीतीने वापरा आणि चालवा. आणि शक्य तेवढे पोलीस विभागाला सहकार्य करा असे पोलिस विभागाकडून सांगण्यात येत आहे.