चकलांबा पोलिसांची वाळू तस्करावर धडाकेबाज कारवाई

140

🔺वाळू ने भरलेले दोन हायवासह‌ वाळू तस्कराच्या आवळल्या मुसक्या

🔺साठ लाख रुपयांचा मुद्द्यामाल केला जप्त

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि. 6मार्च):-चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे व स्टाफ असे अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, राक्षसभवन भागातून वाळूची विनापरवाना बेकायदेशीर चोरटी वाहतूक होत आहे.

त्यानुसार त्यांनी सापळा रचला असता रात्री 21.30 वाजता ड्रायव्हरसह वाळू ने भरलेला एक हायवा व सकाळी 7.00 वाजता ड्रायव्हर सह वाळू ने भरलेला एक हायवा असे एकूण दोन हायवा ( किंमत अंदाजे 60 लाख रुपये) सापळा रचून पकडून त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 58/24 व गुन्हा रजिस्टर नंबर 59/ 24 भादविसं कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे शेख नबी शेख अब्बास, वय 40 राहणार चकलांबा, अहमद शेख राणा उमापूर, नफिर वजीर पठाण वय 28 महार टाकळी, संतोष नाटकर राहणार राक्षसभुवन तालुका गेवराई यांच्यावर गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत.

सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर सर उपवगीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, प्र पोलीस उपनिरीक्षक कुमावत, पो ना / गुजर, पोलीस शिपाई घोंगडे, पवळ,रुईकर, सुरवसे यांनी केली