विद्यानिकेतन मध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा संपन्न…..

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.17डिसेंबर):-विद्यानिकेतन दादावाडी परिसरात सि.बी.एस.सी.विभागाच्या वतीने इयत्ता १ ते १० मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दिड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारी कालावधी नंतर शाळा सुरू झाल्याने विविध उपक्रम राबविले जात आहे. कोरोना नियमांचे पालन करुन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून आला. विद्यानिकेतन स्कुल च्या प्राचार्य सपना पिट्टलवार यांचे मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंजुषा रामटेके यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. विद्यानिकेतन स्कुल चे अध्यक्ष राज रणजितजी पुगलिया यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेषत्वाने कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले.