महात्मा फुले हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप…

30

🔸मुन्नादेवी अँड मंगलादेवी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम…

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.17डिसेंबर):-ज्योतीदेवी अन्नपूर्णा भंडार च्या वर्धापन दिनानिमित्त मुन्नादेवी अँड मंगलादेवी फाऊंडेशनने धरणगाव शहरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना १४ सायकली व शैक्षणिक साहित्य, शहरातील वंचित लोकांना ५० सोलापुरी चादर, ५० जेवणाचे भांडे सेट कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, फाऊंडेशनचे संस्थापक जीवन आप्पा बयस व मान्यवरांच्या हस्ते वाटप केले गेले.

मुन्नादेवी अँड मंगलादेवी फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवनआप्पा बयस व सचिव मुकेशआप्पा बयस त्यांच्या फाऊंडेशनच्या सर्व संचालकांच्या वतीने दरवर्षी धरणगाव शहरात विविध शाळांना शैक्षणिक मदत करीत असतात. तसेच धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल या शाळेवर ही त्यांचे नित्तांत प्रेम आहे . शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. मागील काही काळात त्यांनी महात्मा फुले हायस्कूल चे दोन विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत. त्यांचा शैक्षणिक खर्च ते उचलतात आणि त्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाणी बॉटल, वह्या, शालेय शैक्षणिक साहित्य पुरवितात. दरवर्षी शाळेत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करतात. दोन वर्षांपूर्वी आमच्या शाळेतील विद्यार्थिनी कु.दिपाली नेतकर हिस सायकल भेट देऊन तिला मदतीचा हात दिला. व ही विद्यार्थ्यांनी एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आली.

यावर्षीदेखील फाऊंडेशनने वर्षा गजरे व संदीप गायकवाड या दोन विद्यार्थ्यांना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी.आर. सोनवणे मॅम, पर्यवेक्षक जे.एस.पवार व सर्व शिक्षक वृंद यांनी मुन्नादेवी अँड मंगलादेवी फाऊंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.