विद्यानिकेतन मध्ये राष्ट्रीय गणित दिवस संपन्न….

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22डिसेंबर):-विद्यानिकेतन दादावाडी परिसरात सि.बी.एस.सी.विभागाच्या वतीने महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. गणित विषयाची भीती दूर होऊन त्या विषयाची आवड विद्यार्थ्यांत निर्माण व्हावी यासाठी यानिमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कथाकथन, प्रश्नावली, लेखन,गायन, भौमितिक आकार, आकृती बंध, गणितीय शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी गणितज्ञांचे रेखाचित्र, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत या स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला यावेळी गणित विभागाच्या कु. मीना मंगरूळकर , सुवर्णा गोंधळेकर माया माणूसमारे आणि भावना ठाकूर यांनी परिश्रम घेतले.यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . विद्यानिकेतन स्कुल च्या प्राचार्य सपना पिट्टलवार यांचे मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा संपन्न झाली.कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. विद्यानिकेतन स्कुल चे अध्यक्ष राज रणजितजी पुगलिया यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेषत्वाने कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले.