विद्यानिकेतन मध्ये नृत्याविष्काराचे आयोजन…..

43

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.23डिसेंबर):-विद्यानिकेतन दादावाडी परिसरात सि.बी.एस.सी.विभागाच्या वतीने नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या सिमा बोहरा यांनी परिश्रम घेतले.यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .

विद्यानिकेतन स्कुल च्या प्राचार्य सपना पिट्टलवार यांचे मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा संपन्न झाली. सूत्रसंचालन संध्या मामीडपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. विद्यानिकेतन स्कुल चे अध्यक्ष राज रणजितजी पुगलिया यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेषत्वाने कौतुक केले.