नीटच्या तयारीसाठी आता आष्टीत १ जानेवारीपासुन डॉ.मोराळे बायोलॉजी क्लासेस

27

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.29डिसेंबर):- तालुक्यातील भास्कर अॕकॅडमी फॉर सायन्स ॲन्ड इंजिनिअरिंगचे नामवंत प्रा.शिवाजी राख व प्रख्यात डॉ.मोराळे यांच्या संयुक्त विद्यमाने राख कोचिंग क्लासेस व डॉ.मोराळे बायोलॉजी क्लासेस आष्टी तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नीट,जीईई ,एमएचटी-सीईटी मेडिकल व इंजिनियरिंग प्रवेश परीक्षांची तयारी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आष्टी तालुका व परिसरातील ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना माफक फीसमध्ये या संधीचा फायदा घ्यावा.गेल्या सात वर्षांपासून आष्टीकर यांच्या सेवेत असलेल्या भास्कर ॲकॅडमी सायन्स ॲन्ड इंजिनिअरिंग गुणवत्तापूर्ण निकाल परिसरातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनियर स्वप्न पूर्ण करत आहेत.

आता नीट – जे.ई.ई.- सी. ई. टी.तयारी करण्यासाठी लातूर,पुणे,कोटा येथे जाऊन महागडे कोचिंग घेण्याची आता गरज नाही.त्यापेक्षाही दर्जेदार शिक्षण एकदम माफक फीमध्ये आपल्या आष्टी शहरामध्ये राख कोचिंग क्लासेस आर.सी.सी. ने उपलब्ध करून दिले आहे.सर्व बॅचेस नवीन वर्षात दि.१ जानेवारीपासून सुरू होत आहेत.जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी आपल्या आष्टी शहरांमध्ये राहूनच परीक्षांची तयारी करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सुवार्णा मोराळे व प्रा.इंजि.शिवाजीराव राख यांनी केले आहे.